आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नड शहरात चोरटे झाले सीसीटीव्हीत कैद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेने कन्नड शहरातील मोठी चोरीची घटना टळली. दरम्यान, सराफा दुकाने फोडण्याच्या तयारीत असलेले तिघे जण सीसीटीव्हीत कैद झाल्याची बाब समोर आली आहे.
पोलिस सूत्रानुसार, चाळीसगाव रोडलगत असलेले व्यंकटेश ज्वेलर्स व श्रद्धा ज्वेलर्स ही सराफा दुकाने आहेत. मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास कन्नड ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल ए. पी. मोरताळे, ज्ञानेश्वर बनसोडे गस्तीवर होते. त्यांना व्यंकटेश ज्वेलर्सच्या समोर उभ्या असलेल्या संशयास्पदरीत्या इंडिका कारकडे येताना तिघेजण अस्पष्ट दिसून आले. पंरतु, त्यांच्या दिशेने पाेलिस येत असल्याचे पाहून तिघे कारमध्ये बसून धूमस्टाइलने निघ्ून गेले. पोलिसांनीही पोलिस ठाण्यात माहिती देत त्यांचा पाठलाग केला. दरम्यान, पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलिस उपनिरीक्षक ए. जी. शिंदे, कैलास करवंदे, राजेंद्र मुळे, गणेश चेळेकर आणि पोलिस व्हॅन घेऊन चालक बी . एस. कराळेदेखील पाठलाग करण्यासाठी सहभागी झाले. इंडिका कार औरंगाबादच्या दिशेने गेल्याने खुलताबादसह इतर पोलिस ठाण्यांना माहिती देऊन नाकाबंदी करण्यासंदर्भात कळवले. मात्र, इंडिका कार धूमस्टाइलने पसार झाली.
इरादा सीसीटीव्हीत स्पष्ट
पोलिसांनी व्यंकटेश ज्वेलर्सचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता कारमधून तिघे चोरीच्या उद्देशानेच दुकानाचे शटरजवळ गेल्याचे दिसून आले. तसेच श्रद्धा ज्वेलर्सकडे गेल्याचेही स्पष्ट झाले.