आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृद्धेला लुटणारे चोरटे २४ तासांत गजाआड, मित्राची उधारी चुकवण्यासाठी चोरले होते मंगळसूत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आकाशवाणी परिसरातील मित्रनगरमध्ये भागात विद्या पाटील (६३) यांना चाकूचा धाक दाखवून मंगळसूत्र चोरणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने चोवीस तासांतच अटक केली. मित्राकडून घेतलेले उधार पैसे चुकवण्यासाठी चोरी केल्याचे आरोपी पंकज सुरेश संत्रे (१८, रा. भानुदासनगर, जवाहर कॉलनी) याने सांगितले. त्याचा दुसरा साथीदार अल्पवयीन आहे. रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
घटनास्थळाजवळील एका हॉटेलच्या रुग्णालयाच्या सीसीटीव्हीत चोरट्यांचे छायाचित्र कैद झाले होते. या आधारे पोलिसांनी तपास केला खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दोघांना त्यांच्या घराजवळून अटक केली. दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी असून घरी सांगता त्यांनी मित्रांकडून सुमारे ३५ हजार रुपये उधार घेतले होते. यापूर्वी त्यांनी कुठल्या गुन्ह्यात सहभाग घेतला होता का, याचा तपास पोलिस करत आहेत. ही कामगिरी उपनिरीक्षक अमित बागूल, प्रशांत आवारे, नितिन मोरे, विश्वास शिंदे, विलास वाघ, सुधाकर राठोड, सुनील पाटील, लाल खान पठाण, धर्मराज गायकवाड, राम तांदळे यांनी पार पाडली.
बातम्या आणखी आहेत...