आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thinker L.R.Bali Speak About Buddhism, News In Marathi

सर्व धर्म-संप्रदायांवर बौद्ध धम्माचा प्रभाव, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार एल. आर. बाली यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सध्या अनेक धर्म-संप्रदाय उदयास आले आहेत, मात्र सर्व धर्म-संप्रदायांवर बौद्ध धम्माचाच प्रभाव आहे, असे मत डॉ. बाबासाहेब अांबेडकरांसोबत काम करणारे आणि ज्येष्ठ विचारवंत एल. आर. बाली यांनी व्यक्त केले. संत कबीर शिक्षण संस्थेतर्फे त्यांचा सोमवारी (२५ ऑगस्ट) जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माधवराव बोर्डे होते.
बाली म्हणाले, सर्व धर्मांवर बुद्धांच्या विचारांचा प्रभाव आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी जे जे संत म्हणून इतिहासात अमर झाले, त्यांचे आचारणसुद्धा भगवान बुद्धांच्या धम्म व संघाच्या प्रभावाखालीच होते. संत कबीर तर बुद्ध विचारांचे प्रसारक होते. महापुरुष तेच होतात ज्यांना सामान्यांचे दु:ख, वेदना समजतात. शिवाय त्या सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नव्हे, तर त्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारेच महापुरुष होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यापैकीच एक आहेत. २१ व्या शतकात मुली, स्त्रियांवर बलात्कार केले जातात, त्यांना शिकार करून हिंसेचे बीभत्स प्रदर्शन घडवले जात आहे. मात्र, अशा वाईट प्रवृत्तींचा अंधार दूर करणारे प्रकाश म्हणजे गौतम बुद्ध असून बुद्धांचे विचार अंगीकारले, तर सर्व दु:खे नाहीशी होतील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी बोर्डे यांनी बाली यांचा २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानचिन्ह व शाल देऊन सत्कार केला. गौरवपत्राचे वाचन बुद्धप्रिय कबीर यांनी केले.
व्यासपीठावर अॅड. मनोहर टाकसाळ, अॅड. बी. एच. गायकवाड, सुरेश एडके, व्ही. के. वाघ, प्रा. प्रताप कोचुरे, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. देवदत्त म्हात्रे, सी. एस. इंगळे,श्रीकृष्ण पवार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर, पंजाबराव मोेरे, अॅड. अमोल घोबले, नितीन जैस्वाल, गौतम गायकवाड, सुखदेव मोरे, अजित दांडगे आणि अॅड. धनंजय बोर्डे यांनी परिश्रम घेतले.