आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसरा दिवस हाऊसफुल्ल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गरवारे स्टेडियमवर भरवण्यात आलेल्या महाएक्स्पोमधील शनिवारचा दिवस हाऊसफुल्ल ठरला. तब्बल वीस हजारपेक्षा अधिक औरंगाबादकरांनी महाएक्स्पोला भेट दिली. अ‍ॅग्रोव्हिजनमध्ये सहभागी होण्यासाठी लोकांची झालेली गर्दी पाहून पहिल्या तासाभरातच नोंदणी बंद करण्याची वेळ संयोजकावर आली. नागरिकांचा हा प्रतिसाद न भूतो न भविष्यति असल्याची प्रतिक्रिया अ‍ॅग्रोव्हिजनचे संयोजक बी. ए. खोसे यांनी दिली.


मसिआ आणि आयसाच्या वतीने आयोजित महाएक्स्पोला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळपासून गरवारे स्टेडियमच्या प्रत्येक स्टॉलवर प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती. विशेष म्हणजे प्रत्यके जण स्टॉलवर जाऊन संबंधित उत्पादनांची माहिती जाणून घेत होता. नागरीकाच्या प्रतिसादामुळे आयोजकही भारावून गेले.

असा एक्स्पो झालाच नाही
४ महाएक्स्पोमध्ये मसिआच्या आॅफिसमध्ये येणारा प्रत्येक उद्योजक हा इव्हेंट आंतरराष्ट्रीय दर्जाचा झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. असा कार्यक्रम यापूर्वी शहरात झाला नसल्याची प्रतिक्रिया सर्वच क्षेत्रांतून मिळत आहे. अनेकांना व्हिजन मिळण्यास मदत होईल.
अर्जुन गायके, सदस्य, मसिआ


४सकाळी साडेदहा वाजता कार्यक्रम सुरू झाल्यापासून सायंकाळी सात वाजल्यानंतरही अ‍ॅग्रोव्हिजनमधील एकही सदस्य उठून गेला नाही. सकाळी कार्यक्रमासाठीची अर्ध्या तासात नोंदणी संपली होती. या माध्यमातून उद्योजक यशस्वी व्हावेत, अशी अपेक्षा आहे.
बी. एस. खोसे, संयोजक, अ‍ॅग्रोव्हिजन

४या महाएक्स्पोमुळे लहान उद्योजकांना प्रेरणा मिळणार आहे. ज्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद मिळत आहे त्यावरून लघुउद्योजक वाढीसाठी एक्स्पो चालना देणारा ठरणारा आहे. इंजिनिअरिंगमधल्या नव्या पिढीला यामधून बरेच शिकण्यासारखे आहे. -रणजितसिंह गुलाटी, उद्योजक