आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचखंड, नंदीग्राम, देवगिरी, तपोवन एक्स्प्रेस 8 तास लेट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - इगतपुरीजवळील रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू असल्याने मराठवाड्यातील रेल्वे वाहतूक तिसºया दिवशीही विस्कळीत होती. देवगिरी एक्स्प्रेस, सचखंड एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस आणि तपोवन एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या आठ तासांहून अधिक विलंबाने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अनेकांचे प्रवासाचे वेळापत्रक कोलमडले.
गुरुवारी सकाळी नाशिक-इगतपुरीदरम्यान रेल्वे मार्गावर मालवाहू रेल्वेगाडीचे काही डबे घसरल्याने वाहतूक ठप्प झाली. औरंगाबाद येथून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस मनमाड येथेच थांबवण्यात आली. त्या रेल्वेतील प्रवाशांना पैसे देऊन रेल्वे प्रशासनाने बस किंवा अन्य वाहनांनी जाण्याचा सल्ला दिला होता. हा प्रकार सलग दोन दिवस झाला. नंदीग्राम, देवगिरी, तपोवन, जनशताब्दी आणि सचखंड एक्स्प्रेस या पाचही रेल्वे 6 ते 8 तास विलंबाने औरंगाबाद येथे पोहोचल्या. रविवारी वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.

रात्रीच्या गाड्या पहाटे आल्या
गाडी येण्याची वेळ पोहोचल्याची वेळ
नंदीग्राम रात्री 11.45 सकाळी 7 वाजता
देवगिरी पहाटे 4.30 स. 10.30 वा.
तपोवन दुपारी 1.30 दुपारी 4.30 वा.
सचखंड दुपारी 11.30 रात्री 9.15 वाजता