आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Thirteen Year old Son Theft 9 Bicycle In Fifteen Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेरा वर्षांच्या मुलाने चोरल्या पंधरा दिवसांत 9 दुचाकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरात दुचाकी चोरांनी धुमाकूळ घातला असून एका १३ वर्षांच्या मुलाने मागील पंधरा दिवसांत तब्बल दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले आहे. या कामी त्याला १७ वर्षांचा मित्र मदत करत असे. सिटी चौक पोलिसांनी शुक्रवारी या दोघांनाही चंपा चौक येथून अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. हे दोघे चोरलेल्या दुचाकी धार्मिक स्थळांच्या पार्किंगमध्ये लावत असत.
सिटी चौक पोलिस ठाण्याचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना चंपा चौक येथे दोन लहान मुले दुचाकींची छेडछाड करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना हटकले असता दोघे पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. त्यांची चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. खाक्या दाखवताच हे दोघे दुचाकी चोरत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांच्याकडून दुचाकी जप्त केल्या. मागील पंधरा दिवसांत या दुचाकी चोरल्याची कबुली त्यांनी िदली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. शाहेद सिद्दीकी, हेड कॉन्स्टेबल सुनील राऊत, दिनेश बन, शाहेद पटेल आदींनी केली.
येथून चोरल्या गाड्या
सिटी चौक हद्द : पल्सर: २२० एम एच २० सीडी २३४३ औरंगपुरा येथून चोरली
हीरोहोंडा स्टनर: एमएच२० एसी २०४५ शहागंज येथून चोरली
हीरोहोंडा सीडी डॉन : एमएच२० बीडी १६९८ जामा मशीद, रोजाबाग येथून चोरली
हीरोहोंडा स्प्लेंडर: एम२० बीबी ४६८ शहाबाजार येथून चोरली
जिन्सीपोलिस ठाणे हद्द
होंडा शाइन: एमएच २० बीएच २४९१ चंपा चौक येथून चोरली
होंडाअॅक्टिव्हा : एमएच २० सीपी ७८७० मकसूद कॉलनी येथून चोरली
हीरोहोंडा स्प्लेंडर : एमएच २० एसी १२७५ टाइम्स कॉलनी येथून चोरली
हीरोहोंडा स्प्लेंडर: एमएच २० एपी ६६१२
क्रांती चौक हद्दीतून यामाहा आरएक्स १०० ही दुचाकी नूतन कॉलनी, सिल्लेखाना येथून चोरली.
असे चोरायचे गाड्या
शहरातील हॉस्पिटल, बाजारपेठेत लावलेल्या दुचाकीवर हे दोघे लक्ष ठेवायचे. लहान असल्यामुळे ते चोर असतील अशी शंका कोणालाही येत नसे. त्यानंतर बनावट चावीने दुचाकी सुरू करून ती एखाद्या धार्मिक स्थळाच्या पार्किंगमध्ये लावायचे. काही दिवसानंतर ती दुचाकी दुसऱ्या जिल्ह्यात किंवा शहरात मिळेल त्या भावात विकायचे. यातील १३ वर्षांच्या दुचाकी चोराचे वडील दुकानदार तर दुसऱ्याचे वडील रिक्षाचालक आहेत. एकाचे शिक्षण सहावीपर्यंत झाले आहे.