आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीस महाविद्यालयांचे प्रस्ताव फेटाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नव्या महाविद्यालयांचे ४९ पैकी ३० प्रस्ताव फेटाळले आहेत. फक्त १९ महाविद्यालयांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहेत. गुरुवारी (२८ एप्रिल) कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पदसिद्ध सदस्यांच्या व्यवस्थापन परिषद बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

संशोधन केंद्रांचेही बहुतांश प्रस्ताव फेटाळले आहेत. बुधवार आणि गुरुवार या दोनदिवसीय बैठकीत विद्यापीठाने बृहत आराखड्यानुसार आलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली आहे. बीसीयूडीच्या बैठकीत ३० महाविद्यालये फेटाळण्यात आले होते. त्यावर आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्याशिवाय निवृत्त झालेल्या प्राध्यापकांना कुठलीही प्रशासकीय अथवा महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार नाही. त्यामुळे डॉ. वि. ल. धारूरकर यांच्याकडे असलेले नॅक सल्लागार मंडळाचे समन्वयकपद आणि डॉ. सर्जेराव ठोंबरे यांच्याकडे असलेले गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास संशोधन केंद्राचे संचालकपदही धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्याशिवाय विद्यापीठाच्या निधीतून यापुढे कुणालाही रोजगार दिला जाणार नाही, असाही ठराव करण्यात आला आहे.