आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा पुरस्कार घरचा, तो कधीच परत करणार नाही - अभिनेता योगेश शिरसाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रा. घारे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना शिरसाट.
औरंगाबाद | घरच्यांकडून मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी तो कधीच परत करणार नाही, अशी मिश्कील टिप्पणी प्रख्यात अभिनेता योगेश शिरसाटने केली अन् रसिकांनी हशा-टाळ्यांची त्याला दादही दिली.

सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ‘परिवर्तन’ संस्थेने यंदापासून मराठी रंगभूमी दिनानिमित्त मराठवाडा, औरंगाबादेतील कलावंतांना परिवर्तन नाट्य गौरव पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. पहिला पुरस्कार ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या टीव्हीवरील प्रहसन मालिकेत विविधरंगी भूमिका करणाऱ्या योगेशला देण्याचे ठरले. गुरुवारी तापडिया नाट्यमंदिरात प्रख्यात रंगकर्मी, योगेशचे गुरू प्रा. डॉ. दिलीप घारे यांच्याच हस्ते तो प्रदान करण्यात आला. यावेळी योगेश म्हणाला की, पुरस्कार ही सन्मानाची गोष्ट असते. तो घरच्यांनी दिला असेल तर तो अधिक महत्त्वाचा असतो. बाहेर काय सुरू आहे मला माहिती नाही, पण मी हा पुरस्कार कधीच परत करणार नाही. या वेळी डॉ. सुनील देशपांडे, प्रा. मोहन फुले उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीकांत उमरीकर यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...