आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • This People Solve Water Shortage Problem In Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यांनी केली पाणीटंचाईवर मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- देवळाई परिसरात भरहिवाळ्यातच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ही बाब या भागासाठी आता नवीन राहिलेली नाही. पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी यंत्रणा नाही. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था वा शासनस्तरावर काही होत नाही हे पाहून या भागातील काही लोकांनी स्वत: पुढाकार घेतला. पावसाचा वाया जाणारा प्रत्येक थेंब वाचवला आणि पाण्याची व्यवस्था केली. केवळ शासनावर अवलंबून न राहता या लोकांनी स्वत: पुढाकार घेऊन रेन वॉटर हार्वेस्टिंग केले आणि टंचाईवर मात केली. इच्छाशक्ती असेल तर या मूठभर लोकांनी जे केले ते साता-यातील प्रत्येक घरात होऊ शकते. त्यासाठीच या मूठभरांच्या मोठ्या कामाची दखल घेत आहोत.
एकेकाळी सातारा-देवळाई परिसरात १९८० ते ९० च्या दशकात अगदी १० फुटांवर पाणी लागत होते. पण आता हीच पातळी तब्बल ५०० फुटांवर गेली आहे. आसपास पैठण रोडवरील कांचनवाडी, नक्षत्रवाडी, तसेच बाळापूर, गांधेली थेट झाल्ट्यापर्यंत शहराचा पसारा वाढत गेला. अजूनही नवनव्या वसाहती तयार होत आहेत. त्यामुळे या परिसरात घराघरांत बोअर आले. पण पाण्याचा उपसा आणि एकूणच लोकसंख्येचे प्रमाण बघता हे बोअर, विहिरी आणि पाण्याचे सगळेच स्रोत हिवाळ्यातच कोरडेठाक पडू लागले. यंदा तर भयंकर परिस्थिती आहे. त्यामुळे ‘जो दुस-यावर विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला’ या उक्तीप्रमाणे आपला आपणच उद्धार करावा लागणार आहे. शासन करेल तेव्हा करेल, त्याआधी स्वत:च या टंचाईवर मार्ग काढावा लागेल आणि हे लक्षात घेऊनच काही लोकांनी त्याची अंमलबजावणीही केली. इस्रायलने जशी हार न मानता पाण्याच्या भयंकर दुर्भिक्षावर मात केली तसाच छोटासा प्रयत्न येथील या मूठभर लोकांनी केला आहे. त्यांचा कित्ता सा-या सातारावासीयांनी गिरवायला हवा.

कोण आहेत हे लोक?
अॅड. महेश स्वामी, तुळशीदास कुलकर्णी, राजेंद्र दयाडे, गजेंद्र निळेकर, प्रणिता विजय उकलगावकर. याशिवाय आणखीही काही रहिवाशांनी पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवून रेन वॉटर हार्वेस्टिंग केले व लोकांसमोर एक पर्याय ठेवला आहे.

पुढे वाचा त्यांनी नेमके काय केले?