आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान मुलांना साथीचे आजार टाळण्यासाठी या आहेत गरजेच्या लसी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लसीकरणाअभावी लहान मुलांना वर्षभरात विविध आजारांचा सामना करावा लागतो, असे शहरातील बालरोगतज्ज्ञांनी सांगितले. १० टक्के पालक लसीकरण अर्धवट सोडतात, त्याचा मुलांवर दूरगामी परिणाम होतो. यामुळे उपलब्ध अत्यावश्यक लसी कोणत्या आहेत, प्रत्यक्षात किती आणि कोणत्या लसींची गरज आहे याविषयीची माहिती ‘दिव्य मराठी’ने वाचकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. शासकीय लसीकरण मोहिमेनुसार विविध मनपा आरोग्य केंद्रांवर तसेच घरोघर जाऊन राबविल्या जाणाऱ्या मोहिमेत प्रकारच्या लसी दिल्या जातात. मात्र, आजच्या काळातील विविध आजार पाहता लसी देणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

रुबेला,सव्हाईकलचा फायदा
रूबेलालसीकरणाअभावी वारंवार गर्भपात होण्याची शक्यता असते तर सव्हाईकल कॅन्सरचे लसीकरण नसल्यास गर्भपिशवीचा कर्करोग होण्याची शक्यता बळावते.

सामान्यत:गरजेच्या
रोटाव्हायरस डायरियाची लस दिल्यास अतिसार, जुलाब, उलट्यांना आळा बसतो. टायफाॅइड न्यूमोनियासारख्या आजारांपासून बचाव करता येतो.

अत्यावश्यक
शासकीयकर्करोग रुग्णालयाच्या डॉ. विजय कल्याणकर यांनी सांगितले, दरमहा १२५ ते १५० महिला कर्करोगाने ग्रस्त असल्याचे निदान होत आहे. याशिवाय खासगी रुग्णालयांचा आकडा वेगळा आहे.

लसीकरण पॅकेज
>जन्मल्याच्या२४ तासांत बीसीजी, झीरो पोलिओ आणि झीरो हिपॅटायटिस
>दीड महिन्याचे झाल्यावर धनुर्वात, घटसर्प, डांग्या खोकला यांची त्रिगुणी लस
>कावीळ ची लस
>नवव्या महिन्यानंतर गोवरची लस
>साडेचार ते पाच वर्षांत डीपीटीचा दुसरा बुस्टर डोस
>नवव्या महिन्यापासून दर सहा महिन्यांनी जीवनसत्व ची मात्रा ६व्या वर्षांपर्यंत

पेंटाव्हॅलेंट लस लवकरच सूरू
>शासनाच्यालसीकरण मोहिमेत डीपीटीसोबतच हिपॅटायटिस बी(कावीळ ब) आणि मेंदूज्वर(हिब) या लसींचा समावेश असलेली पेंटाव्हॅलेंट लस ऑगस्ट महिन्यात समाविष्ट केली जणार आहे.
डॉ.स्मिता नळगीरकर, मनपा वैद्यकीय अधिकारी

कॅन्सरची लस महत्त्वाची
>आजगर्भपिशवीचा कर्करोग मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अशा वेळी सव्हाईकल कॅन्सरसाठीची लस देणे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गरजेचे आहे.
डॉ.सचिन देशमुख

>शहरातील खासगी दवाखान्यांतून दिल्या जाणाऱ्या लसींची महिन्याकाठी २० ते २५ लाखांची उलाढाल होते. सुशिक्षित समाज लसीकरणाविषयी जागरूक आहे.
अनुराग जगत, लसींचे मराठवाडा डिस्ट्रिब्यूटर
बातम्या आणखी आहेत...