आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी रंगोत्सवाची : असे तयार करा पर्यावरण स्नेही रंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - होळी आणि धुळवड आली की वॉर्निश आणि रासायनिक रंग डोळ्यांसमोर येतात. त्यापासून दरवर्षी अनेकांना गंभीर इजा होते. म्हणूनच खरी नैसर्गिक होळी कशी खेळावी, त्यासाठी नैसर्गिक रंग कसे तयार करावेत आणि आपल्या परंपरा पूर्वीप्रमाणेच जपून या सणाचा आनंद कसा लुटावा याची माहिती गरवारे कम्युनिटी सेंटर देत आहे. दरवर्षी होळीच्या 15 दिवस आधी यासाठी गरवारेतर्फे एक कार्यशाळा घेतली जाते. त्यातूनच खरा सण कसा साजरा करायचा याची माहिती मिळते. यंदा ही कार्यशाळा येत्या 23 मार्च रोजी होत आहे. त्याविषयी..

गेल्या काही वर्षांपासून होळीच्या सणाचा आनंदाला कलाटणी मिळाली आहे. याचे कारण म्हणजे त्यापासून आनंद मिळण्याऐवजी इजा व त्वचारोग होत आहे. त्यामुळेच हल्ली सगळीकडे ‘इको फ्रेंडली होळी’ या शब्दप्रयोगाचा वापर होत आहे. त्यात यंदा तर भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे इको फ्रेंडली होळीबरोबरच कमीत कमी पाणी वापरून कोरडी व नैसर्गिक होळी सर्वत्र खेळली जावी यासाठी प्रयत्न होत आहे. मात्र, हे रंग तयार करावे कसे, हा प्रश्न असतो. त्याचेच उत्तर या कार्यशाळेत मिळेल.

रासायनिक रंगामुळे होणारे धोके

होळी हा आनंदाचा व उत्साहाचा सण, पण रासायनिक रंगांमुळे रंगाचा बेरंग होतो. तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार रासायनिक रंगात ऑक्साइड असते. त्यामुळे मूत्रपिंडावर विपरीत परिणाम होतात, डोळ्यांना इजा होऊन अंधत्व येऊ शकते, तर कॉपर सल्फेटमुळे त्वचारोग होतात. मक्र्युरिक सल्फेटमुळे कॅन्सरचा धोका असतो. नैसर्गिक फुलांपासून रंग कसे तयार करायचे याची माहिती गरवारेतर्फे प्रसिद्ध केली जाते. कुणाला कार्यशाळेला येणे जमत नसेल तर प्रसिद्धिपत्रक वाचूनही हे सर्व शिकता येते.
नैसर्गिक रंग..
* जांभळा रंग : बीट साल पाण्यात उकळून हा रंग तयार होतो.
* पिवळा रंग : बेलफळाचे साल उकळून एक भाग हळद, दोन भाग पीठ मिर्शण करून हा रंग तयार होतो.
* काळा रंग : आवळ्याचा किस लोखंडी तव्यावर भाजून त्यावर पाणी टाकावे आणि उकळावे.
* लाल रंग : जास्वंदाची फुले, पळस, गुलाब आदी कुटून लगदा तयार करा व तो पाण्यात टाकून ढवळा. या फुलांना वाळवूनही रंग तयार होतो.
* नारंगी रंग : बेलफळाचा गर उकळल्यास हा रंग तयार होतो.
* हिरवा रंग : गहू, ज्वारी, पालक, हिरव्या पानाचा लगदा, मेंदीची पाने कुटून ढवळणे किंवा मेंदीच्या पानांची भुकटी पिठात मिसळल्यावरही हा रंग तयार होतो.
कार्यशाळेची वेळ आणि स्थळ
गरवारे बालभवनच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून शहरातील बच्चेकंपनीसाठी नैसर्गिक रंग तयार करण्याची मोफत कार्यशाळा घेतली जाते. मुलांसाठी ही खरोखरच पर्वणीच असते. कारण त्यांच्या आरोग्यासाठीच ही धडपड सुरू आहे. यंदा 23 रोजी सायंकाळी 5 वाजता सिडको एन -7 येथील गरवारे कम्युनिटी सेंटर येथे मोफत होणार आहे. अधिक माहितीसाठी संचालक सुनील सुतवणे किंवा शिल्पा कुलकर्णी यांना 0240-2472234 व 9922400422 या क्रमांकावर संपर्क साधावा.