आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वर्षी ७० हजार तरुणांची सरकारी नोकरी पक्की, विविध स्पर्धा परीक्षांद्वारे होणार भरती, जानेवारी-एप्रिलमध्ये परीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नवेवर्ष तरुणाईसाठी नोकरीचे ठरणार आहे. जानेवारी २०१७ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत विविध सरकारी कार्यालये, बँका, सार्वजनिक उद्योग, लष्कर , लोकसेवा आयोगामार्फत विविध सुमारे ७० हजार रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यात शिपाई पदापासून ते वर्ग एक अधिकारी पर्यंतच्या पदांचा समावेश आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विक्रीकर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक पाठोपाठ राज्य सेवा परीक्षेसाठी जाहिरात दिली आहे. तर राज्य परिवहन महामंडळाने चालक-वाहकासह इतर एकूण १४ हजारांहून जास्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पुणे महानगर परिवहनने चालक-वाहक, क्लीनरच्या ८०४० पदांसाठी, भेलने ७३८ तर सशस्त्र सीमा दलाने ८७२ विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. विशेष म्हणजे, वित्त मंत्रालयाने विविध २४,५६४ पदांसाठी नोटिफिकेशन दिले आहे. स्टाफ सिलेक्शन, रेल्वे भरती बोर्ड, सार्वजनिक बँका, बीएसएनएलनेही मोठ्या प्रमाणात रिक्त पदे भरण्यासाठी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. एकूणच २०१७ मधील पहिल्या सहामाहीतच सुमारे ७० हजार युवकांना हमखास सरकारी नोकरी मिळणार आहे. 

अभ्यासाचे योग्य नियोजन हवे 
यासंदर्भात पुणे येथील युनिक अकॅडमीचे संचालक मल्हारपाटील यांनीसांगितले, प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम नेमका काय आहे हे सर्वप्रथम समजून घ्यावे. त्यानुसार प्रत्येक विषयाचे काटेकोर नियोजन करावे त्यानुसार अभ्यास करावा. वेळेचेही नियोजन करण्यासाठी अधिकाधिक प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करावा. त्यामुळे आत्मविश्वासही वाढेल, वेळेचा प्रश्न मार्गी लागेल. 
 
एमपीएससीचा धडाका : 
महाराष्ट्रलोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पोलिस उपनिरीक्षकांच्या ७५० , विक्रीकर निरीक्षकांच्या १८१ जागांसाठी जाहिरात दिली आहे. विक्रीकर निरीक्षक पदासाठीची पूर्व परीक्षा २९ जानेवारी तर पीएसआय पूर्व परीक्षा १२ मार्च ला होणार आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा एप्रिलमध्ये आहे. या परीक्षेद्वारे यंदा सहा. विक्रीकर आयुक्त, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, तहसीलदार, अधीक्षक उत्पादन शुल्क, कक्ष अधिकारी आदी १५५ पदे भरण्यात येणार आहेत. 
 
संस्था, कार्यालय पदनाम संख्या 
भेल आयटीआयअप्रेंटिस ७३८
सशस्त्र सीमा दल सबइन्सपेक्टर, एएसअाय ८७२
स्टाफ सिलेक्शन मल्टीटास्किंग स्टाफ ८३००
पुणे महानगर परिवहन चालक,वाहक, क्लिनर ८०४०
वित्त,महसूल मंत्रालय इन्स्पेक्टरगट २४५६४
रिझर्व्ह बँक असिस्टंट६१०
बँक ऑफ बडोदा स्पे.ऑफिसर१०३९
बँक ऑफ बडोदा पिऊनकम स्वीपर २२६३
इंडिया पोस्ट पेमेंट बँक असि.मॅने.ऑफिसर१७१०
बीएसएनएल जेटीओ२५१०
इंडियन बँक प्रोबेशनरीऑफिसर ३२४
सिंडिकेट बँक प्रोबेशनरीऑफिसर ४००
म.रा.परिवहन चालक-वाहक,लिपिक १४,५००
बातम्या आणखी आहेत...