आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Year Hostel Fees Cancel Issue At Dr. BAMU Aurangabad, Divya Marathi

विद्यार्थ्यांचे वसतिगृह शुल्क माफ, दुष्काळजन्य परिस्थितीमुळे विद्यापीठ फंडातून केली जाणार मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गारपिटीनंतर ओढवलेली दुष्काळजन्य परिस्थिती पाहता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे केवळ गारपीटग्रस्तच नव्हे तर विद्यापीठाच्या वसतिगृहांत राहणार्‍या सर्वच विद्यार्थ्यांचे वसतिगृह शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे विद्यापीठावर जवळपास एक कोटी रुपयांचा बोजा पडेल, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी माध्यमांना दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची गुरुवारी बैठक झाली. यात सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. डॉ.चोपडे यांनी सांगितले की, आधी गारपीट आणि आता पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थिती पाहता विद्यापीठ फंडातूनच विद्यार्थ्यांना सहकार्य केले जाणार आहे. त्यामुळे वसतिगृहासाठी लागणारे 2200 रुपये वार्षिक शुल्क माफ करण्यात आले आहे. या निर्णयाचा फायदा दीड हजार विद्यार्थ्यांना होणार आहे.