आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औंदाही साधेपणानेच झाली खांदेमळणी, गुरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- चारवर्षांपासून अत्यल्प पाऊस होत आहे. यंदाही आतापर्यंत मोठा पाऊस झाल्याने जलसाठे कोरडेठाक आहेत. गुरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. या नाराजीत शेतकऱ्यांनी पोळ्याच्या पूर्वसंध्येला सर्जा-राजाला धुऊन खांदेमळणीसाठी तयार केले. शेतकरी वर्गात पोळ्याइतकेच खांदेमळणीलाही महत्त्व आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाच्या खांद्याची तूप, हळद दही-भात लावून शेतकऱ्यांनी मळणी केली. त्यानंतर त्यांच्या डोळ्यांवर भरजरी कपडा टाकून त्यांची दृष्टही काढली. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे कुठेही उत्साह दिसून आला नाही. उद्याचे काय? याच चिंतेने शेतकऱ्यांचे चेहरे काळवंडले होते.

राज्यभरातील शेतकरी ज्या सणाची चातकासारखी वाट पाहतात तो पोळ्याचा सण आला तरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर चिंतेचेच मळभ आहे. पोळ्याच्या पूर्वसंध्येला बैलांच्या खांदेमळणीच्या दिवशीही याचीच प्रचिती आली. पावसाअभावी हैराण झालेल्या वाळूज भागातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी साधेपणाने हा सोहळा साजरा केला. या सणावरही दुष्काळाचे सावट आहे, पण वर्षभर उन्हातान्हात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तो साजरा करणे भाग