आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यंदा उन्हाचा चटका उशिरा बसणार, उत्तरेकडील थंड वा-याचा परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काश्मीर खो-यात अजूनही मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत आहे. तेथील वारे आपल्याकडे वाहत असल्याने यंदा उन्हाचा चटका उशिराने जाणवणार आहे. तसेच उन्हाची
तीव्रताही कमी राहिल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला.

२१ डिसेंबर २०१४ रोजी सूर्याचे उत्तरायण सुरू झाले. त्यामुळे दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ होत चालली आहे. ७ फेब्रुवारीपासून उन्हाळ्याचे चटके जाणवायला सुरुवात होते. मात्र, उत्तरेकडे बर्फवृष्टी होत आहे. तेथील थंड वारे आपल्याकडे वाहत आहेत. यामुळे कमाल व किमान तापमानात किंचित वाढ होत आहे. उकाडा फारसा जाणवत नाही. गतवर्षी पेक्षा यावर्षी तापमान कमीच राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी वर्तवला. सहा दिवसांतील तापमानाचा आलेख पाहता ३० जानेवारीच्या तुलनेत ४ फेब्रुवारीला किमान तापमानात ३.४ व कमाल ३.४ अंश सेल्सियसने वाढ झाली आहे.

हवेचा वेग १० किमी प्रतितास
मागील आठ दिवसांपूर्वी हवा प्रतितास चार ते पाच किमी वेगाने वाहत होती. गत दोन दिवसांपासून हवेचा वेग दुपटीने प्रतितास १० किमी वेगाने वाहत आहे. परिणामी कमाल आणि किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सियसने वाढ होऊनही उकाडा फारसा जाणवत नाही.