आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावर्षी शांतता नोबेलच्या नामांकनाने नोंदवला विक्रम, आतापर्यंत १२९ पुरस्कारार्थी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कोलंबियाचे राष्ट्रपती जुआॅन मॅन्युअल सँटोस यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. २ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे बळी घेणारे आणि ५० वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेले गृहयुद्ध संपुष्टात आणून कोलंबियात शांतता प्रस्थापित करण्यात सँटोस यांनी अमुल्य योगदान दिले आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी ३७६ नामांकने आली होती. ही आजवरची सर्वाधिक आहेत. यात २२८ व्यक्तींचा व १४८ संस्थांचा समावेश होता. यापूर्वी २०१५ मध्ये शांततेसाठीच्या या सर्वोच्च सन्मानासाठी २७३ तर २०१४ मध्ये २७८ नामांकने आली होती. वास्तविक भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकीय, शरीरचनाशास्त्र, साहित्य आणि अर्थशास्त्रासाठी दरवर्षी २५० ते ३०० नामांकने असतात. १९०१ पासून आतापर्यंत शांततेच्या नोबेलसाठी एकूण ४,३२१ नामांकने आली होती. तर, १०३ व्यक्ती आणि २६ संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
एकाच व्यक्तीला ९१ वेळा नामांकन
नोबेल पुरस्काराच्या बाबतीत एकमेवाद्वितीय विक्रम म्हणजे अमेरिकेतील लेिखका, तत्त्ववेत्या, सामाजिक कार्यकर्त्या मानसोपचारतज्ज्ञ जेन अॅडम्स यांचे नामांकन. १९१६ ते १९३१ या काळात त्यांना तब्बल ९१ वेळा नामांकन मिळाले होते. अखेरीस त्यांना एकदा शांततेचा नोबेल मिळाला. व्हिएतनाममधील नेते ली ड्यूक थो यांना १९७३ मध्ये शांततेचे नोबेल जाहीर झाले. मात्र, अमेरिकेने व्हिएतनामशी पुकारलेल्या युद्धामुळे त्यांनी तो नाकारला. नोबेल पुरस्कार नाकारणारे ते जगातील एकमेव व्यक्ती ठरले आहेत.
हिटलरला नामांकन; गांधीजींना चारदा नामांकन
जर्मनीचे अॅडॉल्फ हिटलर हुकूमशहाच्या रूपात जगप्रसिद्ध आहेत . मात्र, १९३९ मध्ये शांततेच्या नोबेलसाठी त्यांना नामांकन मिळाले होते. स्वीडिश संसदेने त्यांना नामांकन दिले होते. मात्र, पुरस्कारा-वेळी त्याचा विचारही करण्यात आला नाही.
अहिंसेचे पुरस्कर्ते म. गांधी यांना शांततेच्या नोबेलसाठी १९३७, १९३८, १९३९, १९४७ मध्ये नामांकन मिळाले.
१९४८ मध्ये त्यांचे नाव निश्चितही झाले. तेव्हाच त्यांची हत्या झाली. हा पुरस्कार मरणोपरांत देत नसल्यानेे त्यांना सन्माना-पासून मुकावे लागले.
०२ वेळा ३-३ व्यक्तींना विभागून पुरस्कार प्रदान.
१६ महिलांना आतापर्यंत शांततेचा नोबेल पुरस्कार.
६२ वर्षे सरासरी वय पुरस्कार विजेत्यांचे.
०३ व्यक्ती पुरस्कार घोषणेवेळी तुरुंगात
होते.
1 विजेत्याने नाकारला होता सन्मान.
१०० वर्षांतील (१९०१-२००१) नुसार नामांकने, विजेते
खंड नामांकन विजेते
पश्चिम युरोप १६९४ ४४
पूर्व युरोप ३२३ ०३
उत्तर अमेरिका ९६४ १९
लॅटिन अमेरिका ३४५ ०५
अाशिया ६७७ १२
आफ्रिका १६४ ०६
आंतरराष्ट्रीय संस्था ६९० २०

बाहेर पुरस्कार जाहीर, विजेते मात्र तुरुंगात
नोबेल पुरस्कारांबाबत एक रंजक माहिती अशी की, तीन व्यक्तींना जेव्हा हा पुरस्कार जाहीर झाला होता. ते तेव्हा तुरुंगात शिक्षा भोगत होती. त्यात जर्मनीचे पत्रकार कार्ल व्होन ओझीत्झकी, म्यानमारमधील नेत्या आंग आंग सान सू की आणि चीनमधील मानवाधिकार कार्यकर्ते लीयू झियाओबो यांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...