आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेतीन एकर ऊस खाक, वाळूज शिवारातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी लागलेल्या आगीत साडेतीन एकर ऊस खाक झाला. छाया : धनंजय दारुंटे
वाळूज - तोडणीला आलेला साडेतीन एकर ऊस जळाल्याची घटना सोमवारी रात्री वाळूज शिवारात घडली. माहिती मिळताच शेतकऱ्यांनी आग विझविल्याने उसाच्या लगतचे क्षेत्र वाचले. दरम्यान, महसूल विभागाने या प्रकाराचा पंचनामा केला असून या घटनेत चार लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, आगीचे कारण अस्पष्ट असून या प्रकाराबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. वाळूज शिवारात अब्जल बेग महेमूद अली बेग यांचे गट क्रमांक १६५ हे बागायती क्षेत्र आहे. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बेग शेतातून घरी परतले. त्यानंतर रात्री साडेसातच्या सुमारास रणजित राजपूत, सब्जर टेलर नारायणपूरकर आदी शेतकऱ्यांनी ऊस पेटल्याची माहिती मोबाइलद्वारे दिली. बेग यांनी तातडीने धाव घेतली. तोपर्यंत प्रसंगावधान राखून शेतकऱ्यांनी आग विझविली. त्यामुळे बेग यांच्या चार एकर क्षेत्रातील अर्धा एकर ऊस तसेच इतर शेतकऱ्यांचे लगतचे उसाचे फड बचावले.

महसूल विभागाकडून पंचनामा
घटनेचीमाहिती मिळाल्यानंतर वाळूज सजाचे तलाठी दीपक कराळे यांनी जळालेल्या उसाची पाहणी केली. नुकसानीचा पंचनामा केला. या वेळी सब्जर टेलर, रणजित राजपूत, यासिन पटेल, रतीलाल राजपूत यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

कर्ज काढून लागवड
बेगयांनी यंदा गोदावरी ग्रामीण बँकेच्या वाळूज शाखेकडून सुमारे साडेतीन लाखांचे कर्ज घेऊन चार एकरावर उसाची लागवड केली होती. साखर कारखान्यांकडून मिळणाऱ्या रकमेतून बँकेचे कर्ज फेडण्याचा त्यांचा विचार होता. सध्या पीक तोडणीला आले आहे. साखर कारखान्यांचे बॉयलर साधारणत: दसऱ्याला पेटतात. मात्र, आगीमुळे त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे.