आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन चिमुकल्यांचा मृत्यू, दोघे औरंगाबादचे तर तिसरा मुलगा जालन्याचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- घाटीरुग्णालयात उपचार सुरू असताना तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला.
भावसिंगपुऱ्यातील अथर्व अमोल दांडगे हा अडीच वर्षांचा बालक रविवारी १६ ऑगस्टच्या दुपारी घराजवळ स्कुटीवर खेळत असताना स्कुटी पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. उपचार सुरू असताना सोमवारी १७ ऑगस्ट रोजी रात्री ११.५० च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अन्य एका घटनेत जालन्यातील माळसोयदेव येथे राहणारा समर्थ विकास शेजूळ (२) हा चिमुकला शनिवारी १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी घरात शेगदाणे खात असताना शेगदाणा घशात अडकल्याने बेशुद्ध पडला होता. घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शेवली ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पायऱ्यावरून पडून मृत्यू
गारखेडापरिसरातील इंदिरानगरचा ईश्वर भारत प्रसाद(५) हा चिमुकला १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी घराजवळ खेळत असताना पायऱ्यावरून तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी झाला होता. घाटीत उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.