आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढोरकीनमध्ये एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढोरकीन- पैठणतालुक्यातील ढोरकीन येथे एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या करून दागिने रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. शुक्रवारी (िद. १०) मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढोरकीन येथील बालानगर फाटा वसाहतीतील शिवाजीराव चव्हाण हे कुटुंबीयांसमवेत घरात झोपलेले असताना चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील दोन हजार रोख, चार चांदीचे शिक्के, दोन सोन्याचे लॉकेट, आठ ग्रॅमचे झुंबर, दोन नेकलेस असा एकूण ७३ हजार ४८० रुपयांचा ऐवज चोरून नेला. तसेच घरातील एलसीडी कागदपत्रांची बॅग घराच्या बाजूला असलेल्या शेतात फेकून दिली. सचिन मुळे यांच्या घरातील सोन्याची पोत काही खाद्यपदार्थही चोरट्यांनी पळवले. यानंतर पगारे यांच्या घराकडे मोर्चा वळवत चोरट्यांनी तीन हजार रुपये रोख लंपास केले. ताराचंद भडके यांच्या घराच्या खिडकीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला असता भडके यांना जाग आल्याने चोरटे तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनी श्वानपथक फिंगर प्रिंट एक्सपर्ट पथकास पाचारण करून तपास सुरू केला. श्वानपथकाने टाकळी फाट्यापर्यंत माग काढला, मात्र तेथून पुढे काही माग लागला नाही. याप्रकरणी वैभव चव्हाण यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोयगाव बसस्थानक परिसरात चोरी
सोयगाव- राज्यरस्ता क्रमांक २४ वरील सोयगाव-चाळीसगाव बसस्थानक परिसरातील भूषण जैन यांच्या मालकीचे महावीर जनरल स्टोअर्स शुक्रवारी रात्री चोरट्यांनी फोडून ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. शनिवारी सकाळी वाजता भूषण जैन दुकान उघडण्यास आले असता, दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. जैन यांनी तत्काळ परिसरातील अन्य व्यापाऱ्यांसह पोलिस ठाणे गाठून याबाबत तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याअगोदर बसस्थानक परिसरातील खेडियार उपाहारगृहाचे शटर तोडून चोरी करणारा आरोपी मंगेश निकम यास सोयगाव पोलिसांनी अटक केली होती.

याप्रकरणी सोयगाव व्यापारी महासंघाच्या वतीने सोयगाव पोलिसांना शनिवारी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, शहरात मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यात दुकान हॉटेलमध्ये चोऱ्या जास्त होत असल्याने व्यापारी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी किंवा ग्राम सुरक्षा दल स्थापन करून त्यांना जबाबदारी सोपवावी. निवेदनावर व्यापारी शिवअप्पा कुल्ली, गोकुळ परदेशी, योगेश बोखारे, गणेश गायकवाड, भूषण जैन, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.