आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Chain Snatching Incident Happen In Aurangabad

औरंगाबादेत आणखी तीन ‘चेन स्नॅचिंग’ च्‍या घटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मंगळसूत्र चोरट्यांनी बुधवारी आणखी तीन चेन स्नॅचिंग करत पोलिसांना आव्हान दिले आहे. यापैकी दोन घटना सिडको ठाण्याच्या हद्दीत, तर तिसरी घटना उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

बुधवारी झालेल्या तिन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी वृद्ध महिलांना लक्ष्य केले, तर दोन घटनांत मॉर्निंग वॉकला जाणार्‍या महिलांचे मंगळसूत्र हिसकावले. या दोन घटनांमुळे सिडको ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मंगळसूत्र चोर्‍यांची संख्या 13 वर पोहोचली आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात आयुक्तालय हद्दीत मंगळसूत्र हिसकावण्याच्या 66 घटना घडल्या होत्या. त्या तुलनेत या वर्षी पाच महिन्यांतच 42 घटना घडल्या आहेत.
सकाळी : 6.45
पहिली घटना

मंगळसूत्राचे वजन : पावणेदोन तोळे, ठाणे हद्द : सिडको
सिडको एन-5 परिसरातील कमलबाई शिवनाथ ब्राह्मणे (68) या मॉर्निंग वॉकसाठी जात होत्या. त्या वेळी फोस्टर महाविद्यालयासमोर दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या युवकाने त्यांच्या गळ्यातील गंठण हिसकावले व पळ काढला. हे युवक 20 ते 22 वयोगटातील असल्याचे कमलबाईंनी सांगितले.


सकाळी : 7.15
मंगळसूत्राचे वजन : सहा तोळे

ठाणे हद्द : सिडको
सिडको एन-5 येथील परितोष कॉम्प्लेक्समधील जॉन्सीराणी कुमार गुरू (65) या मॉर्निंग वॉकवरून परतत असताना दोन भामट्यांनी राज हाइट्समोरून त्यांचे सहा तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले. गुरू या व्यापारी असून त्यांचा प्रिंटिंगचा व्यवसाय आहे.


सकाळी : 11.15
मंगळसूत्राचे वजन : चार तोळे

ठाणे हद्द : उस्मानपुरा
उस्मानपुºयातील शांतादेवी लक्ष्मीनारायण फुलवाल (65) या सकाळी सव्वाअकराच्या सुमारास पन्नालालनगरातील शिवमंदिरातून दर्शन घेऊन सुनेसह घराकडे परतत होत्या. त्या वेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरील एकाने त्यांचे मंगळसूत्र हिसकावले.