आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Horrible: या चिमुकलीला भर पावसात मृत्यूच्या दारात सोडून आले आईवडील, वाचा पुढे काय झाले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जन्माला येऊन तिला अवघे तीनच दिवस झाले होते. जग कसे आहे, नातीगाेती काय असतात हे कळण्यापूर्वीच जन्मदात्यांनीच तिला मृत्यूच्या दाढेत ढकलून दिले. रविवारी सकाळी पैठण रोडवरील गेवराई येथे शेतात निरागस जीव पडत्या पावसात मृत्यूशी झगडत होता. एका हॉटेल मालकामुळे तिला जीवदान मिळाले.

रविवारी सकाळी सातच्या सुमारास हॉटेल व्यावसायिक दत्तात्रय मुळे रस्त्याने जात असताना शेतातून त्यांना बाळाचा रडण्याचा आवाज आला. ते आवाजाच्या दिशेने गेले. एका कपड्यात गुंडाळून ठेवलेली गोंडस मुलगी त्यांना दिसली. तिला गुंडाळलेले कापड पावसाने चिंब भिजले होते. मुळे यांनी घटनेची ग्रामस्थ चिकलठाणा पोलिसांना माहिती दिली. ग्रामस्थांनी या चिमुकलीला ऊब दिली. तिला दूध दिले. त्यामुळे टाहो फोडणारी चिमुकली शांत झाली. तोपर्यंत पोलिस उपनिरीक्षक मीना तुपे, हवालदार राठोड, सुनील गोरे आणि महिला कर्मचारी राठोड घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी या चिमुकलीला घाटीत नेले. आता ही चिमुरडी ठणठणीत आहे.
पुढे वाचा..
> निर्दयी आई-वडिलांचा शोध घेणार... बघा चिमुकलीचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...