आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा: टायर फुटून स्कॉर्पिओचा अपघात; तीन जण ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलकापूर- भरधाव स्कॉर्पिओचे टायर फुटल्यामुळे वाहन रस्त्याच्या खाली जावून उलटले. मंगळवारी मार्चला दुपारी चार वाजता राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल अमन जवळ घडलेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतकामध्ये दोन बालकांचा समावेश आहे. 

लोणार येथून एम.एच. १९/ एपी/ ९१३० या क्र.ची स्कॉर्पिओ भुसावळकडे जात होती. या वाहनातून ११ जण प्रवास करीत होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल अमन जवळ येताच स्कॉर्पिओचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओने रस्त्याच्या खाली जावून तीन ते चार पलट्या घेतल्या. 

या अपघातात चालक अफजलखान सलीमखान वय ३० रा. मुस्लीम कॉलनी भुसावळ, जुबीयाबी शेख मुश्ताक वय १० वर्षे रा. भुसावळ मुद्दशिरखान इम्रानखान वय वर्षे या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अमिरखान इद्रिसखान वय २३, इद्रिसखान अहेमदखान वय ५५, ईरफानखान इद्रीसखान वय २२, नाजमाखातून इद्रीसखान वय ५०, सहेमाबी अमिरखान वय २०, सुमय्या इम्रानखान वय २२, रेहानाबी मुश्ताक अहेमद वय २५, तबस्सुम इरफानखान वय २० नशिमाबी शेख सलीम वय ४५ सर्व रा. भुसावळ हे गंभीर जखमी झाले आहेत. 

अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करून त्यांना जळगावला हलवले. या घटनेमुळे भुसावळ येथे शोककळा पसरली.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...