आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात इंडिकाला धडकून दुचाकीवरील तिघे ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद - ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात इंडिकाला धडकून दुचाकीवरील तिघे रस्त्यालगत पडले. तेवढय़ात समोरून आलेल्या दुसर्‍या इंडिकाने त्यांना चिरडले. यात तिघांचाही मृत्यू झाला. औरंगाबाद-खुलताबाद मार्गावरील कागजीपुरा गावाजवळ मंगळवारी सायंकाळी सात वाजता हा विचित्र अपघात झाला.

औरंगाबादकडे जाणार्‍या इंडिका कारला (एमएच 18 डब्ल्यू 4529) दुचाकीवरील (एमएच 17 एएच 1028) रामेश्वर मारुती थोरात, शिवराम चंद्रभान सरोटे व अप्पासाहेब सूर्यभान मिसाळ हे ओव्हरटेक करत होते. त्यात ते तोल जाऊन ते पडले. दुसर्‍या इंडिकाने (एमएच 22 एच 815) त्यांना चिरडले. रामेश्वर व शिवरामचा जागीच, तर अप्पासाहेबचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला.