आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन सोहळ्याला गालबोट: राज्यात 10 जणांचा बुडून मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किशोर सोनार या युवकाचा दारणा धरणात बुडून मृत्यू झाला. - Divya Marathi
किशोर सोनार या युवकाचा दारणा धरणात बुडून मृत्यू झाला.
औरंगाबाद/पुणे/नाशिक-  पैठण तालुक्यातील बिडकीन येथे शिवनाई तलावात घरगुती गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 3 मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यू झालेले तिघेही जण 8 ते 10 वर्षांचे आहेत. आदर्श किर्तीशाई, सागर तेलभाते, राजेश गायकवाड अशी मृत्यू  झालेल्या मुलांची नावे आहेत. विसर्जनावेळी दौलताबादच्या तलावात गाळात पाय रुतल्याने एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात जामनेरच्या शेंदुर्णी येथे विसर्जनावेळी दोन तरुणांचा धरणात बुडून मृत्यू झाला. 
 
बिडकीन येथील घटनेबाबत पोलिस उपनिरीक्षक सिध्दार्थ गढे यांनी सांगितले की, 4 मुले गणपती विसर्जनासाठी गेली होती. ते तलावात उतरले आणि पाण्यात बुडाले. त्याच्यापैकी एक जण सुदैवाने बचावला. या मुलाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात येणार आहेत. 

नाशिकमध्ये गणपती विसर्जनादरम्यान एका 23 वर्षीय तरुणाचा सेल्फीच्या नादापायी नदीत बुडून मृत्यू झाला आहे. नाशिकमधील चेहेडी परिसरातील किशोन सोनार हा 23 वर्षीय तरुण आपल्या आई वडिलांसोबत विसर्जनासाठी दारणा नदीपात्रात गेला होता. यावेळी सेल्फी घेण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि तो नदीत बुडाला. ही घटना दुपारी 2 च्या सुमारास घडली.

पुण्यात 3 जणांचा मृत्यू

पुण्यातील मरकळ (ता. खेड) येथे इंद्रायणी नदीत गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अनिल वरपे (वय 18, रा. मरकळ, ता.खेड) असे तरुणाचे नाव आहे. मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.

पुण्यात जगताप डेअरी येथे कस्पटे वस्ती या ठिकाणी 2 युवक नदीत वाहून गेले .  सोनाजी धनाजी शेळके  (वय 15, रा. गुरुदास बालवडकर चाळ , बालेवाडी, , मूळ राहणार जिंतूर, परभणी) व रखमाजी सुधाकर वारकड (वय 18, रा. रोहिदास चाळ, बालेवाडी) अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत. त्यांचे मृतदेह सापडले आहेत. 

बीडमध्येही एकाचा मृत्यू
बीड जिल्ह्यात गणपती विसर्जन करताना मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.माजलगाव तालुक्यातील उमरी येथे ही घटना घडली आहे. पांडुरंग महादेव धायतिडक (वय 15) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याला 6 बहिणी आहेत. या घटनेने उमरी गावावर शोककळा पसरली आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...