आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच फ्लॅटची अनेकांना विक्री : बिल्डर कैलास बारवालविरुद्ध तीन एफआयआर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एकच सदनिका तीन ते चार जणांना विकून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर कैलास रोहिदास बारवाल (४०, रा. पदमपुरा) यांच्याविरोधात गुरुवारी तीन तक्रारींवरून गुन्हे दाखल केले. त्यापूर्वीच्या एका गुन्ह्यात बारवाल याला १० जुलै रोजीच्या तक्रारीवरून अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

याप्रकरणी ‘दिव्य मराठी’ डीबी स्टारने १२ जुलै बारवाल याच्या घोटाळ्याचा सविस्तर भांडाफोड केला होता. शब्बीर इब्राहिम मोटोेरवाला (४८, रा. माजगाव) यांनी बारवाल यांच्याकडून तिसगाव येथील यश निर्मिती अपार्टमेंटमध्ये दुसरा मजला खरेदी केला होता. त्यासाठी २० लाख रुपयांची रक्कम आरटीजीएसद्वारे त्यांनी बारवाल यांना दिली. परंतु जागेची माहिती घेतली असता बारवाल यांनी पूर्वीच त्या जमिनीचे मूळ मालक पडलवार इतर दोघांकडून जीपीए घेतला आहे. त्या वेळेस झालेल्या करारानुसार मोटोरवाला यांना विकलेला मजला आधीच पडलवार यांच्या हिश्श्यात गेलेला असल्याचे मोटोरवाला यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेऊन याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर २० लाखांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले, सहायक पोलिस निरीक्षक एस. आर. कौठाळे, उपनिरीक्षक सुभाष खंडागळे, हेड कॉन्स्टेबल विलास कुलकर्णी पुढील चौकशी करत आहेत. 

दुसऱ्या प्रकरणात अजय शांतीलाल टोनगिरे इतर एकाने बारवालच्या मे. कन्सेप्ट बिल्डर अँड डेव्हलपर्सच्या कांचनवाडी येथील अष्टविनायक एन्क्‍लेव्हमध्ये फ्लॅट खरेदी केला. या कराराअंतर्गत टोनगिरे यांनी घेतलेल्या तीस लाखांच्या कर्जासाठी बारवाल याने एनओसीदेखील दिली. कर्ज मंजूर झाल्यानंतर फ्लॅटची रजिस्ट्री करून रजिस्ट्रीची मूळ कागदपत्रे एचडीएफसी बँकेकडे तारण ठेवली. त्यामुळे टोनगिरे यांचे कर्ज थकले आणि त्यामुळे कर्जखाते बंद करण्यात आले. बँकेचे विधी अधिकारी नारायण कनकदंडे यांनी चौकशी केल्यावर कैलास बारवालचे अनेक कारनामे समोर आले. टोनगिरे यांना विक्री केलेला फ्लॅट बारवालने बँकेकडे तारण ठेवला आणि तोच फ्लॅट या दरम्यान संजय चौधरी आणि पवन चौधरी यांना ४२ लाख रुपयांमध्ये विकून त्यांच्यासोबतदेखील करार केला. हा प्रकार समोर येताच कनकदंडे यांनी उस्मानपुरा ठाण्यात तक्रार दिली. यासाठी शेट्टी यांनी बारवालला तीन वर्षांमध्ये एकूण ४० लाख रुपये दिले. वेळेत फ्लॅटचा ताबा दिला नाही तर दिलेल्या रकमेवर ३६ टक्के व्याज देण्याचे आश्वासन दिले. परंतु इतके आश्वासन देऊनही बारवाल याने बनावट कागदपत्रांचा वापर करून शेट्टी यांना दिलेला एक फ्लॅट नरेश प्रभाकर महाले यांना, तर दुसरा फ्लॅट नितीन अरुण ललवानी यांना विकला. 

दुप्पट परताव्याचे आमिष दिले 
बारवालयाने केवळ फ्लॅट विक्रीमध्ये फसवणूक करता सुनील भोजा शेट्टी (रा. बन्सीलालनगर) यांना पडेगाव तिसगाव येथील गृह प्रकल्पात गुंतवणूक करायला लावून त्याचा दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवले आणि त्यासाठी करारनामाही करून दिला. 
बातम्या आणखी आहेत...