आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन आमदार, तीन विवाह, तीन रंग; राज्यातील तीन आमदारांचा शाही विवाह सोहळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र अामदार संताेष दानवे व प्रख्यात गायक राजेश सरकटे यांची कन्या रेणू यांचा विवाह बीड बायपासवरील जबिंदा इस्टेट येथे गुरुवारी शाही थाटात पार पडला. या विवाहास मुख्यमंत्र्यांसह मंत्री, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती हाेती. - Divya Marathi
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र अामदार संताेष दानवे व प्रख्यात गायक राजेश सरकटे यांची कन्या रेणू यांचा विवाह बीड बायपासवरील जबिंदा इस्टेट येथे गुरुवारी शाही थाटात पार पडला. या विवाहास मुख्यमंत्र्यांसह मंत्री, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती हाेती.
औरंगाबाद-  आमदार संतोष दानवे, आमदार आकाश फुंडकर यांचा विवाह सोहळा श्रीमंती थाटात साजरा झाला, तर आमदार राहुल जगताप सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होत आहेत.

दानवेंचा शाही विवाह सोहळा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा मुलगा आमदार संतोष आणि प्रख्यात गायक राजेश सरकटे यांच्या मुलीचा शाही विवाह सोहळा गुरुवारी सायंकाळी जबिंदा इस्टेट येथे झाला. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज आहिर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सुमारे २५ मंत्र्यांनी तसेच किमान ७० हजार लोकांनी हजेरी लावली. चार एकरांवर शामियाना उभारण्यात आला होता. 
 
मंडप, स्टेज डेकोरेशन : सुमारे १.५ कोटी 
भोजनावरील खर्च : सुमारे २.५ कोटी
मेनू : विविध मिठाई, मल्टीकझिन भोजन

जगताप सामुदायिक सोहळ्यात बोहल्यावर
आमदार राहुल जगताप रविवारी (दि. ५ मार्च) सामुदायिक विवाह सोहळ्यात बाेहल्यावर चढणार आहेत. शहर औद्योगिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण-देसाई यांची कन्या डॉ. प्रणोती यांच्याशी राहुल यांचा विवाह होणार आहे. पिंपळगाव पिसे येथे रविवारी होणाऱ्या या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन व खर्च जगताप कुटुंब करणार आहे. या विवाह सोहळ्याला शरद पवार, अजित पवार, मंत्री, आमदार उपस्थित राहणार आहेत.

फुंडकरांचा श्रीमंती थाट
आमदार आकाश फुंडकर यांचे लग्न १ मार्चला खामगाव जि. बुलडाणा येथे पार पडले. यासाठी खामगाव मतदारसंघातील प्रत्येक घरात लग्नपत्रिका देण्यात आली. खामगावात मंत्र्यांच्या आगमनासाठी ८ हेलिपॅड उभारण्यात आले होते. केंद्रिय मंंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस ,२० मंत्री, आजी माजी खासदार, आमदार, विधानसभा अध्यक्ष, जिल्हाधिकारी व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मंडप, स्टेज डेकोरेशन : १ कोटी रुपयांच्या वर खर्च.
भोजन : वरण, भात, पातोड्याची भाजी, पोळी अशी पंगत
 
सामान्य नागरिकांना शाही विवाहसोहळ्याचा फटका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून काँग्रेसचे नारायण राणे, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, खा. छत्रपती संभाजी महाराज, अजित कडकडे तसेच उषा  मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, कीर्ती गायकवाड ही गायक मंडळी, राज्य केंद्रातील मिळून २५ पेक्षा अधिक मंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला खरा, परंतु याचा फटका बीड बायपास, उस्मानपुरा ते शिवाजीनगर असा प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना बसला. सायंकाळी ६ ते रात्री ९ असे तीन तास येथील वाहतूक ठप्प होती. मुख्यमंत्री, मंत्र्यांसाठी पोलिसांनी वेळोवेळी वाहने रोखून धरली. त्यामुळे बीड बायपासवर तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. 

नागरिकांनी लग्न सोहळ्याजवळील रस्त्यावरून प्रवास करण्याचे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले होते. परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही. दुतर्फा रांगांमुळे वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली. रात्री ९ वाजता जेव्हा सर्व मंत्रिगणांची विमाने मुंबईच्या दिशेने उडाली, तेव्हाच येथील वाहतूक सुरळीत झाली. या तीन तासांच्या काळात या परिसरात सर्वत्र लाल दिव्याच्याच मोटारी दिसत होत्या. 

या लग्न सोहळ्याची राज्यभर चर्चा होती. सर्वच राजकीय पक्षांतील नेते, मंत्री येणार हेही पक्के होते. भाजपचे सर्व मंत्री तसेच विरोधी पक्षातील नेते, मराठवाड्यातील सनदी तसेच पोलिस अधिकारी या सोहळ्याला हजर होते. औरंगाबाद, जालना या दोन्हीही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातूनही वऱ्हाडी मोठ्या संख्येने आले होते. आजूबाजूच्या मोकळ्या जागांवर वाहने उभी करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु ही व्यवस्था अपुरी पडल्याने रस्त्याच्या कडेला वाहने उभी करण्यात आली. त्यामुळे वाहतुकीला आणखी अडथळे आले. ‘संतोषचे लग्न कधी होणार असा प्रश्न दोन वर्षांपासून विचारला जात होता, त्याचे उत्तर हजारोंच्या उपस्थित मिळाले एकदाचे’ अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या. अन्य मंत्र्यांनीही शुभेच्छा दिल्या. 

वऱ्हाडींची संख्या मोठी असणार याचा अंदाज असल्याने दुपारी दोन वाजेपासूनच जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. व्हीआयपींसाठी स्वतंत्र व्यवस्था होती. ग्रामीण वऱ्हाडी व्हीआयपींसाठी वेगवेगळे मेन होते. लग्न लागल्यानंतर व्हीआयपी भोजनावळीत जाऊन फडणवीस यांनीही पाहुणचार घेतला. त्यांनी फक्त सूप आणि मिठाई तेवढी घेतली.

२५ हजार ग्रामीण वऱ्हाडींसाठीचा मेनू
आलू मटर, चणा मसाला, शेव बुंदी, पुरी, चपाती, दाल फ्राय, जिरा राइस आणि चटणी. 

१ हजार व्यक्तींसाठी असा होता व्हीआयपी मेनू
दालफ्राय, जिरा राइस, कश्मिरी पुलाव, व्हेज मंचुरियन, रगडा, प्रकारचे ज्यूस, व्हॅनिला आइस्क्रीम, आलू मटर, बैंगन मसाला, पनीर मसाला, भरलेला कांदा, गरम तंदूर, बाजरीची भाकरी, ठेचा, लसूण चटणी, वेगवेगळे चायनीज पदार्थ, मुंबई पाणीपुरी, रगडा. 

प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य 
चार्टरफ्लाइटला परवानगी देताना विमानतळ प्राधिकरणाचे नियम, प्रवाशांची सुरक्षितता आणि इतर विमानांच्या वेळा बिघडू देणे यास प्राधान्यक्रम द्यावा लागतो. त्यानुसार नियोजन करून चार्टर फ्लाइट्सना परवानगी दिली. चोख नियोजन असल्यामुळे एकाही विमानाला हवेत राहण्याची वेळ येणार नाही याची काळजी घेतली.
- शरद येवले, प्रभारी विमानतळ संचालक
 
पुढील स्लाइडवर पाहा...
१० खासगी विमानांतून आले पाहुणे
- लग्नातील शाही थाट... फोटोज्...
 
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, भाजप प्रदेशाध्‍यक्ष रावसाहेब दानवे यांच्‍या मुलाच्‍या लग्‍नाचे फोटोज... छाया: रवि खंडाळकर 
बातम्या आणखी आहेत...