आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ते तीन तास पाऊस- पिकांचे अतोनात नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज-वाळूज महानगर परिसरात शुक्रवारी (24 जानेवारी) रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकर्‍यांची धांदल उडाली. या अवकाळी पावसाने वेचणीला आलेला कापूस, मका व बाजरीसोबतच तोडणीला आलेल्या उसाचेही नुकसान झाले.
शुक्रवारी ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर उकाडा जाणवल्याने शेतकर्‍यांना पावसाचा अंदाज होता. मात्र, मोठा पाऊस येईल असे वाटले नव्हते. सायंकाळी सोसाट्याच्या वार्‍यासह पावसांच्या सरी कोसळल्या. मात्र, हवेत उष्णता कायम होती. रात्री 11 वाजेच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि पाहता-पाहता पावसाने जोर धरला. तब्बल दोन ते अडीच तास मुसळधार पाऊस कोसळला. अनेकांच्या घरात पाणी शिरले. या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी हतबल झाला. वाळूजसह पंढरपूर, शिवराई, नायगाव, नाराणपूर, लांझी, वळदगाव आदी भागात सुमारे अडीच
शेतकर्‍यांनी मका व बाजरीची खळी क रून ठेवली होती. अनेक शेतकर्‍यांनी मका सुकण्यासाठी खळ्यावर टाकला होता. अनेकांनी मळणी यंत्रासाठी प्रतीक्षा करत बाजरी खळ्यावर टाकली होती. मात्र, अवकाळी पावसामुळे मका व बाजरीची खळी भिजल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. महिना-दीड महिन्यापासून शेतकरी कापूस वेचणीला लागला आहे. अंदाजे दोन-दोन वेचण्या झाल्या आहेत. अजूनही कापूस वेचणी सुरू होती. मजुरांच्या तुटवड्यामुळे अनेकांनी नंतर वेचू म्हणून कापूस तसाच ठेवला. मात्र, पावसाने त्यांच्या आशेवर पाणी फेरले.
पावसाचे पाणी घरात
घरात पाणी शिरल्याने अनेकांना झोपणे अशक्य झाले. पंढरपूरच्या फुलेनगर, जोगेश्वरीतील आंबेडकरनगर झोपडपट्टी व वडगाव क ोल्हाटी येथील झोपडपट्टीतील अनेक घरांत पाणी शिरले. रांजणगाव शेणपुंजी येथील पवननगर, साईनगर भागातही पावसामुळे धांदल उडाली. सांडपाण्याची गटारे कचरा अडकल्याने तुंबली. त्यामुळे गटारातील पावसाचे पाणी घरात शिरले. अचानक वीज गूल झाल्याने नागरिकांची आणखी त्रेधा उडाली. मात्र, लवकरच वीजपुरवठा सुरळीत झाला.
शेतकरी काय म्हणतात?
विजेच्या लपंडावामुळे मक्याला वेळेवर पाणी मिळाले नाही. त्यामुळे पीक मध्यम प्रतीचे आले. आता पावसामुळे खळ्यातील कणसे भिजली. त्यामुळे कमी भाव मिळणार आहे. सुदाम शिंदे, शेतकरी
रात्री पावसाला सुरुवात झाली. बाजरीची व मक्याची कणसे भिजली. ती झाकण्यासाठी जाईपर्यंत मुसळधार पाऊ स सुरू झाल्याने सर्व कणसे भिजून मोठे नुकसान झाले आहे. माणिकराव झळके, शेतकरी