आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ते तीन तास पाऊस- पिकांचे अतोनात नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-निवडणुकीत निवडून येणार्‍या उमेदवाराला 35 ते 40 टक्केच मते मिळतात. विजयी उमेदवार जात, धर्म, समाजाचाच विचार करतो, म्हणून विकास होत नाही. हे थांबवायचे असेल तर तरुणांनो मतदान करुन देश घडवा, असे आवाहन पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी केले.‘पक गयी है आरसे, बातो सर होती नही, कुछ हंगामा हो जाये, ऐसे गुजर होती नही, असा शेर सादर केला.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोगाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पोलिस आयुक्तांनी केलेल्या आवाहनाला तरुणांनीही दाद दिली. या वेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे, कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रितेश कुमार, जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांच्यासह आयोगाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
गेल्या सहा दशकांनंतरही देशाचा सर्वव्यापी विकास न झाल्यामुळे युवकांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्यासाठी मतदानातून त्यांनी आपली ताकद दाखवावी. 100 टक्के मतदान झाले तर चांगली माणसे निवडली जातील, देशाचा विकास होईल, असा आशावाद कुलगुरू डॉ. पांढरीपांडे यांनी व्यक्त केला.मुंग्या आपापले योगदान देऊन मोठ्ठे वारूळ घडवतात, युवकांनीही मतदानाचा हक्क बजावून देश घडवावा, असे आवाहन नितीन गद्रे यांनी केले. या वेळी मतदानाचा हक्क बजावण्याची प्रतिज्ञा सर्वांनी घेतली. त्याचबरोबर मतदार नोंदणीचे कार्य करणार्‍या आयोगाच्या कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला.
मतदानाचा हक्क बजावण्याची प्रतिज्ञा घेताना विशेष पोलिस महानिरीक्षक रितेश कुमार,पोलिस आयुक्त संजय कुमार,राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रम कुमार. छाया : रवी खंडाळकर
मतदार चळवळ निर्माण करा : डॉ. काकोडकर
मतदार प्रलोभनाला बळी पडतात. त्यामुळे अनेकजण मतदानच करत नाहीत. परिणामी लोकशाही बळकट होण्याची प्रक्रिया ठप्प होते. योग्य माणसे निवडली जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे. मतदारांच्या अपेक्षांची जाहीर चर्चा व्हावी. उमेदवारांना त्याची जाणीव असावी. चांगली कामे न करणार्‍यावर दबाव वाढला म्हणजे विकासाचा गाडा गती घेतो, मतदारांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे डॉ. काकोडकर म्हणाले.