आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत चोरट्यांच्या मारहाणीत तिघे जखमी, एक गंभीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिडकीन - येथील बालाजीनगरमध्ये चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून मारहाण करत 35 हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला. ही घटना बुधवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास घडली. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत तीन जण जखमी झाले असून एकजण गंभीर आहे. याप्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.


बालाजीनगर भागातील घटना घडण्यापूर्वी चोरट्यांनी यशोदीपनगरमधील भुजंगराव ढोरकुले यांच्या घरी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, गोकुळअष्टमीचा उपवास सोडून नुकतेच बसलेले भुजंगराव यांच्या लक्षात आले की, कंपाउंडमधील दुचाकी काढण्याचा आवाज आला. त्यांनी दरवाजा उघडला असता दरवाजाच्या बाहेर चौघे जण, तर वॉल कंपाउंडच्या बाहेर दोघे चोरटे त्यांना दिसून आले. त्याच दरम्यान त्यांचा मुलगा गणेश बाहेर आला. तेव्हा त्यांनी ‘चोर चोर’ असा आरडाओरडा केला. त्यानंतर चोरट्यांनी रावसाहेब नारायण मंडलिक यांच्या घराच्या दरवाजास जोराचा धक्का देत त्यांनी दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी दांपत्यासह त्यांच्या मुलाला शस्त्राचा धाक दाखवत मारहाण करून कपाटातील रोख रक्कम दोन हजार रुपये, तसेच मणिमंगळसूत्र, एक ओम, कर्णफुले असा एकूण 35 हजार 250 रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला.


पोलिस अधिकार्‍यांची भेट
सकाळीच श्वान पथक घटनास्थळी पोहोचले. चोरट्यांच्या चप्पलवरून श्वानाने बालाजीनगरमध्ये मंडलिक यांच्या घरापर्यंत माग काढला. याप्रकरणी अप्पर पोलिस अधीक्षक निर्मलादेवी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.