आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Three Lac Student Get To Text Book Of School Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन लाख विद्यार्थ्यांना मिळणार पाठय़पुस्तके

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: मागणी नसल्याने बालभारतीकडे एक कोटी रुपयांची पुस्तके पडून असल्याचे वृत्त दिव्य मराठीने प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषद आणि पालिका प्रशासनाला अखेर जाग आली. त्यामुळे त्यांनी शाळांसाठी पुस्तकांची मागणी नोंदवल्यानंतर शुक्रवारपासून पुस्तकांचे वितरण सुरू झाले.
शाळा सुरू होण्यासाठी फक्त पंधरा दिवसांचा अवधी राहिला असतानाही जिल्हा परिषद किंवा महापालिकेने बालभारतीकडे पाठय़ पुस्तकांची मागणी केलेली नाही. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची अंदाजे संख्या गृहीत धरून तयार केलेली विविध विषयांची एक कोटी पुस्तके बालभारती केंद्रात पडून असल्याचे वृत्त दिव्य मराठीने 24 मे रोजी प्रकाशित केले होते.
हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने निविदा सादर केली असून पुस्तकांचे वितरण सुरू झाले आहे. आतापर्यंत औरंगाबादच्या तालुक्यांमध्ये 96 टक्के पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती बालभारती विभागातील बी.एन. पुरी यांनी दिली.
सर्व शिक्षा अभियानातून इयत्ता पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 15 जून रोजी सर्व विषयाचे पुस्तके वाटप करण्यात येणार आहे. या वेळी 3 लाख 85 हजार 195 पुस्तकांचे वाटप होणार असून हा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानातून जिल्हा परिषद, अनुदानित, अंशत: अनुदानित असलेल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना ही पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शंभर टक्के पुस्तके मिळावीत. यासाठी आतापासूनच वितरण करणे सुरू आहे.