आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वापाच लाखांपैकी तीन लाख शेतकरी बिगर कर्जदार; कृषी विभागाने दिली माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद जिल्ह्यातील लाख २९ हजारांपैकी लाख २९ हजार शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळाले आहे, तर तीन लाख शेतकरी बिगर कर्जदार असल्याचे सोमवारी झालेल्या खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत समोर आले. कृषी कर्जाची अचूक माहिती दिल्याबद्दल जिल्हा उपनिबंधकांची पालकमंत्री रामदास कदम यांनी खरडपट्टी काढली. तसेच जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, कृषी विभाग, जिल्हा निबंधकांनी याबाबत बैठका घ्याव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वगळता इतरांना त्यांनी बैठकीतून बाहेर काढले. 

जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बैठकीला अनुपस्थित असल्याने कृषी कर्जाच्या माहिती देताना गोंधळ उडाला. जिल्ह्यात किती लोकांना कर्ज मिळाले आणि किती बाकी राहिले, असे कदमांनी विचारले. जिल्हा उपनिबंधकांना अचूक तपशील देता येईना. कृषी अधीक्षक एस. जी. पडवळ यांनी बाजू सांभाळत पाच लाख २९ हजार खातेधारकांपैकी लाख २९ हजार शेतकऱ्यांना कर्ज वितरित केले. मात्र, तीन लाख शेतकऱ्यांनी अजूनही कर्ज घेतले नसल्याचे सांगितले. 

जिल्ह्यात सन २०१७ -१८ मध्ये १४५४ कोटी रुपयांचे पीक कर्ज देण्याचे नियोजन आहे. तीन लाख शेतकरी कर्जापासून वंचित का? राष्ट्रीयीकृत बँकांनी किती कर्ज दिले, असे कदम यांनी जिल्हा उपनिबंधकांना विचारले. तेव्हा त्यांनी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक माहिती देत नसल्याचे सांगितले. त्यावर कदम संतापून म्हणाले की, मग तुम्ही काय करता? माहिती घेणे तुमचे काम आहे. सगळ्या शेतकऱ्यांना कर्जासाठी किती रुपये लागतील, त्यावर हजार कोटी, असे उत्तर मिळाल्यावर पुन्हा पडवळांनी बाजू सांभाळत २६०० कोटी रुपये पीकनिहाय मंजुरीसाठी लागतील, असे सांगितले. या वेळी दोघांचा विसंवाद पाहून कदम यांनी जिल्हा उपनिबंधकांना तंबी देत “तुम्ही तुमचे नियोजन करा, इथे वाद नको. याबाबत बैठक घ्या,’ असे आदेश दिले. 

यावर्षीच्या खरिपाचे नियोजन असे...
जिल्ह्यातखरीप पेरणी क्षेत्र लाख २९ हजार हेक्टर असून यामध्ये कापूस लाख ८० हजार, मका लाख ८७ हजार, बाजरी ४१ हजार, कडधान्ये ८८ हजार हेक्टरवर घेण्याचे नियोजन आहे. ५० हजार ८४८ क्विंटल सर्व पिकांच्या बियाण्यांची तर बीटी कापसासाठी १९ लाख हजार ३२७ पाकिटांची मागणी केली आहे. लाख १९ हजार २०० मेट्रिक टन रासायनिक खत येणार आहे. खत गुणवत्ता नियंत्रणासाठी १० भरारी पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली. या वेळी खासदार चंद्रकांत खैरे, उपमहापौर स्मिता घोगरे, स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले, माजी महापौर त्र्यंबक तुपे, मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आदी उपस्थित होते. 

आंबेडकरनगरातील मनपा रुग्णालयासाठी कोटी 
मनपातर्फेआंबेडकरनगरात ३० खाटांचे रुग्णालय उभारले जाणार आहे. त्यासाठी कोटी रुपये दिले जातील. पहिल्या टप्प्यात ५० लाखांचा निधी दिल्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत सांिगतले. एमजीएम परिसरात होणाऱ्या बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानासाठी २० कोटी रुपये दिले जातील, असेही ते म्हणाले. चिकलठाणा विमानतळ प्रवेशद्वारासामोर ५० लाख रुपये खर्चून अजिंठा लेणी, कैलास स्तंभाची प्रतिकृती उभारली जाईल. पडेगाव परिसरात सफारी पार्कसाठी १०० एकर जागा शासनाने दिली आहे. त्यालगतची ८६ हेक्टर जमीन पर्यटनासाठी संपादित केली जाणार आहे. एक कोटी ३० लाख खर्चून शहरात पर्यावरणपूरक संदेश देणारे २३१ फलक लावले जातील, असे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...