आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकचालकाला लुटणारे तिघे अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - साजापूर फाट्याजवळ ट्रकचालकास अडवून मारहाण करत लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांच्या पोलिसांनी अवघ्या पंधरा तासांत मुसक्या आवळल्या. सुमित उर्फ सोन्या सुभाष पंडित (२५, भुजबळ नगर, नंदनवन कॉलनी), शेख आमीर शेख सलीम (२०, रा. मिठ्ठालाल नगर, भावसिंगपुरा), योगेश अनिल वर्मा (२१, रा. भुजबळ नगर, न्यू नंदनवन कॉलनी) अशी दरोडेखोरांची नावे आहेत.
औरंगाबाद-मुंबई महामार्गावर साजापूर फाट्याजवळ ऑगस्ट रोजी रात्री वाजता दरोडेखोरांनी एका ट्रकचालकास मारहाण करून लुटले होते. त्याच्याकडील मोबाइल रोख रक्कम हिसकावून पळ काढला होता. ऑगस्ट रोजी सायंकाळी वाजेपासूनच पोलिस छावणी रोडवर गस्त घालत होते. या वेळी पोलिसांना तीन तरुण मोटारसायकलजवळ (एम एच - २० - डी एक्स - १३७) संशयितरीत्या उभे असलेले आढळले. त्यांची विचारपूस करण्यासाठी पोलिस त्यांच्या दिशेने जात असतानाच तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी ट्रकचालकाला लुटल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून मोबाइल आणि ३६ २२५ रुपये रोख रक्कम जप्त केली. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याकडे त्यांचे हस्तांतरण करण्यात आले. पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक अमित बागुल, हवालदार नितीन मोरे, पोलिस नाईक सुधाकर राठोड, विलास वाघ, सुनील पाटील, शिवाजी भोसले, लालखान पठाण, इजाज खान यांनी ही कारवाई केली. दौलताबाद ठाण्याचे निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे राजेश पोहनकर यांनी या मोहिमेत सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...