आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डकरे खुनाच्या तपासासाठी पोलिसांची तीन पथके रवाना, धागेदोरे सापडत नाहीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ. चित्राडकरे यांच्या खुनात कुठल्याही प्रकारचे धागेदोरे सापडत नाहीत. त्यामुळे तपास पुढे सरकत नाही हे लक्षात आल्यामुळे पोलिसांनी पुन्हा एकदा यावल, हिवरखेड आणि पनवेल या ठिकाणी पथक पाठवून शोध सुरू केला आहे.

चित्रा डकरे यांचा खून कुठल्या हेतूने करण्यात आला हे अजून स्पष्ट होत नाही. त्यामुळे बडे अधिकारी स्वत: जातीने लक्ष घालून शोध घेत आहेत. शहरातील तीन पोलिस ठाण्यांतील उपनिरीक्षक आणि कर्मचारी तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. यातील एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक ढोकरे यांना यावलला पाठवण्यात आले आहे. हे गाव डॉ. नीलेश आसवार यांचे आहे, तर मुकुंदवाडी येथील पोलिस उपनिरीक्षक कल्याण शेळके यांना हिवरखेड येथे पाठवण्यात आले आहे. चित्रा यांचे हे मूळ गाव आहे, तर सिडको ठाण्याचे उपनिरीक्षक सागर कोते यांना पनवेल येथे पाठवण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...