आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रकच्या धडकेने स्विफ्ट तवेरावर आदळली, सहा ठार; रहिमपूरजवळची घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूजजवळील रहिमपूरनजीक सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण दुर्घटनेत गंगापूरकडे जाणाऱ्या तवेरा कारची झालेली अवस्था. - Divya Marathi
वाळूजजवळील रहिमपूरनजीक सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण दुर्घटनेत गंगापूरकडे जाणाऱ्या तवेरा कारची झालेली अवस्था.
औरंगाबाद - वाळूजपासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्‍या रहिमपूर फाट्याजवळ मागून येणारा भरधाव ट्रक स्विफ्टवर धडकला आणि त्यासरशी स्विफ्ट दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या तवेरावर आदळली. या विचित्र अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर आहे. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये औरंगाबाद ग्रामीण पोलिस विभागात काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना घेऊन स्विफ्ट कार (एम एच २१ एस १०३३) गंगापूरहून औरंगाबादला येत होती. तवेरा कार (एम एच २० एएस १०८९) गंगापूरकडे जात होती. स्विफ्टला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. त्यामुळे स्विफ्ट कार दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या तवेरावर आदळली. या अपघातात अशोक पोपटराव थोरात (४५, टीव्ही सेंटर), सय्यद मेहबूब सय्यद इस्माईल (३४, हर्सूल), भगवान भिकन दुधे हे ग्रामीण पोलिस दलात काम करणारे तीन कर्मचारी तसेच शेख मजीद शेख रहेमान (४५) आणि शेख मोहसीन शेख मुसा (३०, दोघेही रा. दौलताबाद) हे दोन फळ व्यापारी यांचा आणि एका ५० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी आहे, त्याचेही नाव कळू शकले नाही, अशी माहिती घाटीतील डॉक्टरांनी दिली.
पुढील स्लाईडवर वाचा, बदली झाल्याने औरंगाबादला येत होते पोलिस कर्मचारी....