आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरात स्वाइन फ्लूचे तीन संशयित, तर घाटीत एक रुग्ण गंभीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - तीन दिवसांपूर्वी कन्नडच्या एका गर्भवती महिलेचा मृत्यू होत नाही तोच स्वाइन फ्लूचे तीन संशयित रुग्ण शनिवारी (दहा ऑगस्ट) घाटीमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये हडकोतील एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती घाटी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

घाटीत वडवली (ता. पैठण) येथील एक 26 वर्षीय गरोदर महिला, मंठा (जि. जालना) येथील 13 वर्षांची मुलगी, तर एन -9 हडकोतील 53 वर्षीय पुरुष उपचार घेत आहेत. हडकोतील संशयित रुग्णाला स्वाइन फ्लू असल्याचा अहवाल खासगी प्रयोगशाळेतून देण्यात आहे. या रुग्णाची प्रकृती गंभीर असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. युसुफ मणियार यांनी दिली. गर्भवती महिला व मुलीच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे. तिघांच्या लाळेचे नमुने (स्व्ॉब) पुण्याच्या ‘एनआयव्ही’ला पाठवण्यात आले आहेत, असे औषधी विभागातील मुख्य निवासी डॉक्टर डॉ. गोविंद कासट यांनी सांगितले.

रुग्णांचे नमुने ‘एनआयव्ही’कडे : घाटीत दाखल झालेल्या संशयित रुग्णांचेच स्व्ॉब ‘एनआयव्ही’कडे पाठवण्यात येतात. जे रुग्ण केवळ घाटीच्या बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतात, त्यांचे नमुने पाठवण्यात येत नाहीत. तसेच ‘एनआयव्ही’चा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरच स्वाइन फ्लू असल्याचे निष्पन्न होते, असे औषधी विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर यांनी सांगितले.