आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाअभावी तीन हजार हेक्टरवरील पीक माेडीत, तहसीलदार म्हणतात, स्थलांतराच्या अफवा नकोत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- पावसाने दाेन महिन्यांपासून दडी मारल्याने खरीप लागवडीतील तीन हजार हेक्टरवरील पीक वाया जाणार असले तरी गावातच मुबलक प्रमाणात राेजगार उपलब्ध असल्याने सध्या तरी कुणीही स्थलांतर केले नसल्याचे सांगत अफवा पसरवून गावकऱ्यांना बदनाम करू नका, असा इशारा तहसीलदार महेश सावंत यांनी दिला अाहे. पैठण तालुक्यात सध्या गेल्या महिनाभरापासून पाऊस नसल्याने तालुक्यातील सुमारे ४० टक्के पिके मोडीत आली अाहेत. परंतु गेल्या चार-पाच दिवसांत पाचोड दावरवाडी परिसरात हलक्या पावसाने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असला तरी गावात स्थलांतर करण्याइतपत परिस्थिती नसल्याचे पैठण तालुक्यातील ब्रह्मगाव तांडा येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

निम्मा पैठण तालुका दुष्काळाच्या छायेत अाहे. मागील तीन वर्षेही तालुक्याला दुष्काळाची झळ साेसावी लागली अाहे. असे असतानाही दुष्काळावर मात करत तालुक्यातील चितेगाव पैठणमधील एमआयडीसीमध्ये सहज रोजगार उपलब्ध होत असल्याने स्थलांतर हाेत नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले अाहे. 

तालुक्यातखुरपणीची कामे 
नांदर, दावरवाडी, अाडूळ, बालानगर, पाचाेड, कातपूर अादी भागातील पिके तग धरून असल्याने या भागात माेठ्या प्रमाणात खुरपणीचे काम सुरू असल्याने पैठण शहरासह जायकवाडी, राहुलनगर येथील महिलांना शेतामध्ये राेजगार उपलब्ध हाेत असल्याने यंदा तरी स्थलांतराचा प्रश्न नसल्याचे या महिलांचे म्हणणे अाहे. 

काही जण जातात 
दोन महिन्यांपासुन पीकला पावसाचे पाणी नसल्याने ती वाया जाण्याच्या मार्गावर आहे. परंतू परिस्थिती अद्याप फारशी गंभीर दिसत नाही. सध्यातरी स्थलांतर करण्यासारखी वेळ आली नाही. आणखी ज्वारी लागवडीसाठी कालावधी असल्याने स्थलांतर करण्याचा विषय कोठे येतो.जेव्हा खरीपाबरोबर रब्बी दिवाळीनंतर हातचा गेला तेव्हा स्थलांतर काही प्रमाणात होते. - रावसाहेब मगरे, शेतकरी मुरमा ता.पैठण 

अद्याप परिस्थिती जेमतेम 
पैठण तालुक्यात ७७ हजार हेक्टर पेरणी झाली असून त्यापैकी तीस ते चाळीस टक्के क्षेत्रावरील पिक परिस्थिती धोकादायक असुन ते वाया जाणार असे चित्र आहे. मात्र यामुळे एकाही गावात स्थलांतर अद्याप झाले नाही. 
- भाऊसाहेब पायघण, तालुका कृषी अधिकारी 

काही जण जातात 
आडूळ परिसरातील लहान मोठ्या तांड्यावरील लोक हे दर वर्षी सतत रोजगारसाठी औरंगाबाद, चितेगाव परिसरात जातात. - शिरपाल राठोड, सरपंच, आडूळ 

बिऱ्हाड पाठीवरच 
ब्रह्मगावतांडायेथील बंजारा, वंजारी समाज जास्त असून या गावातील अनेक नागरिक हे रोजगारासाठी वर्षेभर ही एका गावाहून दुसऱ्या गावात जातात,याला स्थलांतर म्हणता येणार नाही. 
- जयाजी सूर्यवंशी, शेतकरी नेते 

स्थलांतराचा प्रश्न 
मराठवाड्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असली तरी रोजगारांची समस्या नाही. रोजगार उपलब्ध नसल्यास स्थलांतराचा प्रश्न उदभवतो. पैठण एमआयडीसी मध्ये स्थानिक परिसरातील लोकांना सहज रोजगार उपलब्ध होतो. यात स्थलांतरीत लोक अद्याप तरी आले नाहीत. दुष्काळाची परिस्थिती असली तरी रोजगार समस्या निर्माण झालेली नाही. - अशोक आठवले, व्यवस्थापक, पेप्सीको कंपनी, एमआयडीसी पैठण 

स्थलांतर नाहीच 
तालुक्यातून एकानेही स्थलांतर केलेले नाही. मागेल त्याला राेजगार उपलब्ध करून दिला जात असल्याने स्थलांतर हाेतेय असे म्हणणे चुकीचे अाहे. 
- महेशसावंत, तहसीलदार, पैठण 

मागेल त्याला राेजगार 
गावातच काहीना काही काम मिळत असल्याने सध्या तरी गावातून स्थलांतर हाेताना दिसत नाही. नांदर, दावरवाडीत दुष्काळ परिस्थिती असली तरी सध्या तालुक्यात स्थलांतर नाही. 
- विजय गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य, नांदर. 

अफवा पसरवू नका 
जिल्ह्यातअद्यापतरीस्थलांतरासारखी परिस्थिती नाही. काही जण चुकीचे वृत्त पसरवीत अाहेत. पैठणमध्ये एकाही कुटुंबाचेे स्थलांतर नाही. राेजगाराचा प्रश्न नसल्याने स्थलांतर नाही. 
- भाऊसाहेबजाधव, उपविभागीय अधिकारी, 

पावसाची प्रतीक्षा 
महिनाभरापासूनपावसानेदडी मारल्याने पीके धोक्यात आली आहे. परंतू सध्या परिसरात खुरपणी इतर कामे करून घर चालवत आहोत. पावसाची प्रतीक्षा आहे. 
- रमेशगायके, शेतकरी पैठण 

पैठण तालुक्यातील ब्रम्हगाव तांडा येथे स्थलांतराविषयी माहिती घेतली असता गावात लोक चौकातील ठिकाणी जमत होते.यात शेतकरी, मजूर, तरूण कामावरून आल्यावर सायंकाळी एका ठिकाणी जमून पीक- पाणी, रोजगारासह एकमेकांच्या सुखादुखाच्या गोष्टी जाणून त्यात सहभागी होतात. 
बातम्या आणखी आहेत...