आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचार्‍यांची दादागिरी, बारापट करवसुली!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - निर्धारित रहदारी (प्रवेश) शुल्काच्या बारापट अतिरिक्त रक्कम मागणार्‍या आणि ते न दिल्याने ट्रकचालकास बेदम मारहाण करणार्‍या पाच कर्मचार्‍यांवर शुक्रवारी पहाटे खंडणीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या सर्वांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
गोलवाडी येथील छावणी परिषदेच्या वतीने शहरात प्रवेश करणार्‍या मालवाहू खासगी वाहनांकडून रहदारी शुल्क वसुलीचे कंत्राट मालेगाव (नाशिक) येथील मयूर एंटरप्राइजेस या कंपनीला देण्यात आले आहे.
शुक्रवारी पहाटे नवी मुंबईतील वसई येथून अजय ट्रान्सपोर्टचे पाच मालवाहू ट्रक अमरावतीला जाण्यासाठी गोलवाडी फाट्यावर आले. तेथे हे ट्रक अडवण्यात आले. शुल्कवसुली करणार्‍या पाच कर्मचार्‍यांनी सर्वात समोर असलेल्या ट्रकचा चालक भगवान वाटोरे यांना रहदारी शुल्कापोटी पाच ट्रकचे 2200 रुपये मागितले.
मुळात एका ट्रकमागे रहदारी शुल्कापोटी शंभर रुपये आकारायला हवेत. त्यामुळे वाटोरे यांनी हा कर जास्त होतो म्हणून 2200 रुपये देण्यास नकार दिला. हो-नाही म्हणत 1200 रुपयांवर तडजोड झाली. वाटोरे यांनी पैसे दिले. मात्र, कर्मचार्‍यांनी त्यांना केवळ 240 रुपयांची पावती दिली. त्यामुळे जेवढी रक्कम दिली तेवढय़ाचीच पावती द्या, असा रेटा वाटोरे यांनी लावल्याने नाक्यावरील कर्मचारी भागीनाथ पंडित राठोड (रा. पडेगाव), राजू बसवराज लिंगे (रा. अब्दीमंडी), लखन केशव सलामपुरे (रा. गोलवाडी), अनिल माणिक गोलदेवकर (रा. शांतीपुरा) आणि रमेश उत्तम कनिसे (रा. गोलवाडी) त्यांना बेदम मारहाण केली. जखमी वाटोरे यांनी छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पाच जणांविरुद्ध मारहाण व खंडणीचा गुन्हा दाखल केला. या प्रक रणाचा तपास उपनिरीक्षक रावसाहेब कीर्तिकर पुढील तपास करीत आहेत.