आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडीवर दगडफेक.. जीव मुठीत.. अन‌् देवाचा धावा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्राच्या विविध शहरांमधून चाैधरी यात्रा कंपनीच्या माध्यमातून आम्ही सुमारे ३० पर्यटक काश्मीर दर्शनासाठी गेलाे हाेताे. मात्र, पहलगामला जात असताना हा आत्मघाती हल्ला झाला. सात तास चाललेल्या या चकमकीत सर्व तिन्ही अतिरेक्यांचा खात्मा झाला. परंतु, गोळीबारात एका नागरिकाचाही मृत्यू झाला. त्यामुळे अकड गावानजीक स्थानिकांनी माेठे अांदाेलन करीत रस्ता राेखून धरल्याने पर्यटकांची वाहने जागीच राेखली गेली. सकाळी १० वाजेपासून सायंकाळी वाजेपर्यंत या वाहनांना पुढेही जाऊ दिले जात नव्हते अाणि मागेही फिरू दिले जात नव्हते. सर्व प्रवासी जीव मुठीत धरून बसले हाेते. गाडीवर दगडफेक करण्यात अाली. त्यामुळे अनेक काचा फुटल्यावर तर अाम्ही सर्व जण गाडीच्या मधल्या पॅसेजमध्ये कसेबसे बसून देवाची प्रार्थना करीत हाेताे. अखेरीस कसेबसे अाम्ही ज्या हाॅटेलमध्ये साेमवारी रात्री थांबलेलाे हाेताे, त्या श्रीनगरच्या हाॅटेलचालकाशी संपर्क साधण्यात ट्रॅव्हल कंपनीला यश अाले. मग त्याने स्थानिक तीन सुमाे पाठवून अाम्हाला छाेट्या गाड्यांमधून पुन्हा श्रीनगरला अाणण्याची व्यवस्था केली. मात्र, या गाड्यांमध्ये बसून अाम्ही कसेबसे मागे येऊ लागलाे, तरी स्थानिकांनी अाम्हाला अनेक ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला. अखेरीस अामच्या गाड्यांच्या चालकांनी शाॅर्टकट शाेधून काढत दुसऱ्या मार्गाने वाहने वळवली.
ड्रायव्हरला मारझाेड
यारस्त्यावरून थाेडे अंतर पुढे अाल्यावर तीन वाहनांपैकी एका वाहनाला मध्येच अडवून ड्रायव्हरला मारहाण करण्यात अाली. तसेच अाम्हाला पण खाली उतरण्यास सांगण्यात अाले. अाम्ही सगळेजण प्रचंड घाबरलाे हाेताे.मात्र, चालकाने कशीबशी त्यांच्यातून सुटका करून घेत पुन्हा अाम्हाला श्रीनगरमधील हाॅटेल जॅपनीजपर्यंत अाणून साेडल्यावरच अाम्ही सुटकेचा नि:श्वास साेडल्याचे गाढवे सरांनी अगदी भावनेने अाेथंबलेल्या शब्दात सांगितले.

आज जम्मूला निघणार
^श्रीनगरला प्रचंड धुके असल्याने ३० तारखेपर्यंतची विमानांची उड्डाणे रद्द झाली अाहेत. त्यामुळे अाम्हाला श्रीनगरमधून बुधवारीदेखील निघता अाले नाही. अाता अाम्ही गुरुवारी इथून जम्मूला जाणार असून, तिथून रेल्वेने नाशिकला येणार अाहाेत. साै.कल्पना अाणि दत्तात्रय देवरे, नाशिक

यात्रे करू सुरक्षित
^अामच्याकडे अालेल्यांपैकी सर्व यात्रेकरू अाता सुरक्षित अाहेत. त्यांना गुरुवारीच जम्मूला साेडण्याची व्यवस्था केली जाणार असून, तिथे पाेहचेपर्यंत त्यांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली जाईल. समीर अारीफ, संचालक, हाॅटेल जॅपनीज, श्रीनगर

स्थानिकांची मदत कामी
^पर्यटकांवर अालेल्या अापत्कालीन परिस्थितीत काश्मीरमधील स्थानिक परिचितांची चांगलीच मदत झाली. त्यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी तत्काळ तीन सुमाे पाठवून पर्यटकांची त्या प्रसंगातून सुटका करून दिली असून, अाता सर्व प्रवासी सुखरूप असून, लवकरच अापापल्या गावी पाेहाेचतील. ब्रिजमाेहन चाैधरी, संचालक, चाैधरी यात्रा कंपनी