आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर्सूलच्या यात्रेत घोड्यांच्या चित्तथरारक शर्यती, क्षणाक्षणाला उत्कंठा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
औरंगाबाद- हर्सूलच्या कुलस्वामिनी हरसिद्धी देवीच्या यात्रेत सोमवारी घोड्यांच्या चित्तथरारक शर्यती झाल्या. खास शर्यतीसाठी तयार केलेल्या या घोड्यांनी आधी कसरती करून दाखवल्या. नंतर हे घोडे हर्सूल तलावाच्या मैदानात शर्यतीसाठी उतरले. शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. 

२८ घोडे शर्यतीत सामील 
औरंगाबाद, बीड, परळी, परभणी, लातूर, उस्मानाबादचे घोडे शर्यतीसाठी आले होते. 

एडक्यांची टक्कर 
यात्रेत पाळीव प्राण्यांच्या विविध स्पर्धाही झाल्या. सुंदर प्राणी, देखणी चाल या स्पर्धांबरोबरच एडक्यांची टक्कर लक्षवेधी होती. 
 
आरिब ठरला अव्वल 
घोड्यांच्या या चित्तथरारक शर्यतीत परळी वैजनाथचा आरिब या घोड्याने पहिला क्रमांक पटकावला. त्याच्या मालकाला ११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. 
 
पुढील स्लाइडवर...चारपाईवर हिराने केलेल्या नृत्याने मने जिंकली
 

 
 
 
बातम्या आणखी आहेत...