आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाला फेकणाऱ्या‘त्या’ तक्रारदारावरच गुन्हा, खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- टाऊनहॉल उड्डाणपुलावरून तरुणाला खाली फेकून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तक्रारदार तरुणाविरोधातच आता गुन्हा दाखल होणार आहे. तक्रारदाराने खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केली. त्यामुळे त्यांची नावे आरोपपत्रातून वगळून तक्रारदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. 

बेगमपुरा परिसरात जमिनीच्या वादातून शेख कलीम इतर काही जणांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली होती. त्यामुळे शेख कलीम त्याचा मित्र सोहेल बावजीर याला घेऊन फेब्रुवारी रोजी घाटी रुग्णालयात उपचारासाठी गेला होता. परंतु रुग्णालयातून परत येताना दोघांना चार ते पाच जणांनी अडवून मारहाण केली. यात काहींनी शेख कलीमला पुलावरून खाली फेकले. जमिनीच्या वादातून हा प्रकार झाला होता. यात कलीम गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याचा मित्र सोहेलने बेगमपुरा पाेलिसांना दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावरून अहेमद शेख इमाम शेख ऊर्फ पटेल, मुजीब हबीब शेख ऊर्फ पटेल, शेख नाजेर शेख शहानूर ऊर्फ पहेलवान, अब्दुल अहेमद वली मोहम्मद ऊर्फ मोतीवाला ऊर्फ कादर यांना ताब्यात घेतले. 

परंतु सोहेलने खोटी माहिती देत या आरोपींना विनाकारण गोवले असल्याचे तपासाअंती स्पष्ट आले. त्यामुळे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आरोपपत्रातून आरोपींची नावे वगळण्याचे आदेश देऊन सोहेल बवाजीर याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. 
बातम्या आणखी आहेत...