आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धन-ऋण प्रभारांच्या संयोगातून राज्यात पाडणार धो-धो पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आकाशातील ढगांत धन प्रभाराचे अणू आणि सौर ऊर्जेतून उत्पन्न झालेले ऋण प्रभाराचे अणू यांच्या संयोगातून १८ ते २० टक्के जास्त पाऊस पाडता येतो असा दावा ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ मॅट हॅन्डबरी यांनी केला. त्यांनी विकसित केलेल्या आयन एक्स्चेंज पद्धतीने ऑस्ट्रेलिया व ओमान देश सुजलाम सुफलाम झाले, भारतात सौर ऊर्जा मुबलक असल्याने येथे सौर ऊर्जेतून भरपूर पाऊस पाडता येईल, असा दावा हॅन्डबरी यांनी केला अाहे.
इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स संघटनेच्या वतीने अाैरंगाबादेत अायाेजित कार्यक्रमात हॅन्डबरी यांनी ऑस्ट्रेलीयन रेन टेक्नाॅलॉजीचा प्रयोग समजावून सांगितला. या वेळी जलतज्ज्ञ माधवराव चितळे, इंजिनिअर्स असोसिएशनचे मानद सचिव सुभाष चांदसुरे, जलसंपदा विभागाचे माजी संचालक शंकर नागरे, यांच्यासह विद्यार्थी अन् जिज्ञासूंची उपस्थिती होती. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नालाही हॅन्डबरी यांनी या वेळी उत्तरे दिली.

पुढे वाचा...
> अशी आहे आॅस्ट्रेलीयन रेन टेक्नॉलॉजी
> एका टॉवरसाठी १० लाख खर्च
बातम्या आणखी आहेत...