आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणसूत्र चाचणीतून वेळीच शोधता येतात बाळाचे दोष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सोनोग्राफी तंत्राद्वारे बाळातील शारीरिक व्यंग आधीच लक्षात येऊ शकतात. तसेच कधीही बरे होणारे आत्मकेंद्रीपण किंवा इतर आजारही गुणसूत्रांच्या चाचणीद्वारे वेळीच ओळखता येतात. त्यामुळे असे मूल होण्यापासून रोखण्याचा अधिकार पालकांना आहे. शारीरिक व्यंग असलेल्या बाळासोबत कुटुंबाची होणारी होरपळ थांबवता येईल, असे गुणसूत्रतज्ज्ञ डॉ. अलका एकबोटे यांनी सांगितले.

कमलनयन बजाज रुग्णालयात गुरुवार, १६ जून रोजी झालेल्या कार्यशाळेनंतर त्यांच्याशी संवाद साधला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यशाळेत ११ आत्मकेंद्री मुलांचे त्यांनी परीक्षण केले. यापूर्वीही अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन करून गुणसूत्र चाचणी, दोष आणि निवारण याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
डॉ. अलका म्हणाल्या, आत्मकेंद्रीपणाच्या आजारात मेंदूतील सूक्ष्म बदलाने आजाराचा प्रकार बदलतो. या मुलांना आपण सामान्य मूल समजत नाही, पण त्यांच्यामध्ये वेगळी कौशल्ये असतात, त्यांना ओळखून तसेच प्रशिक्षण आणि वातावरण निर्माण केल्यास प्रगती होऊ शकते. आजची कार्यशाळा प्राथमिक होती. यामध्ये आम्ही प्रामुख्याने पालकांकडून काही माहिती भरवून घेतली. त्यानुसार त्यांना मार्गदर्शन केले. गुणसूत्र चाचणीच्या आधारे बाळातील सूक्ष्म आजार जन्मापूर्वीच ओळखता येतील, असेही त्या म्हणाल्या. गेल्या आठ महिन्यांपासून सुरू झालेल्या या उपचारासाठी पंधराशे ते ४० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.
गुणसूत्रांचावाटा फक्त टक्के : याआजारात गुणसूत्रांचा वाटा फक्त टक्के आहे. ९० टक्के प्रमाण हे गर्भारपणात वाढलेला रक्तदाब, मधुमेह, जन्माच्या वेळी होणाऱ्या गुंतागुंतीमुळे असे आजार होतात.
दुसरे मूलही असेच होईल का?
आत्मकेंद्री (ऑटिस्टिक, सेरेब्रल पाल्सी) किंवा झटके येणारे मूल जन्माला आल्यानंतर बहुतांश पालकांच्या मनात भीती असते. आम्हाला होणारे दुसरे अपत्यही असेच असेल का, हा प्रश्न अनेकांनी विचारला. दुसरे मूलही त्याच आजाराने ग्रस्त असू नये म्हणून या बाळाच्या गुणसूत्रांची चाचणी करावी लागते. दुसरे बाळ पोटात असताना १० ते १४ व्या आठवड्यात कोरिऑन व्हील्स बायोप्सी या चाचणीद्वारे गुणसूत्रांतील दोष शोधावा लागतो. त्याची आणि पहिल्या बाळाच्या गुणसूत्रांची रचना सारखीच असेल तर आजार त्याही बाळात असेल. अशा वेळी पालकांना बाळ होऊ द्यायचे किंवा नाही हा निर्णय घेता येतो.