आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायकोर्ट एक्स्प्रेसमधून सहप्रवाशाने 80 वर्षीय वृद्धाला खाली फेकले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मनमाड-धर्माबाद हायकोर्ट एक्स्प्रेसमधून शेख हुसेन शेख हसन या ८० वर्षीय वृद्धाला विलास मदन सभादिंडे या सहप्रवाशाने खाली फेकले. लासूर- पोटूळ रेल्वेस्टेशनदरम्यान दुपारी पाच वाजता हा प्रकार घडला. हा प्रकार पाहून जागरूक प्रवाशांनी चेन ओढून रेल्वे थांबवली आणि वृद्धाला औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर आणून रुग्णालयात दाखल केले. वृद्धाची प्रकृती गंभीर असून घाटी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. 

शनिवारी हायकोर्ट एक्स्प्रेस औरंगाबादकडे येत असताना लासूर ते पोटूळ स्टेशनदरम्यान एका वृद्धाला त्याच्यासोबत असलेल्या एका सहप्रवाशाने अचानक डब्यातून खाली फेकले. हा प्रकार रेल्वे प्रवासी सेनेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ इतर प्रवाशांना चेन ओढण्यास सांगितले. रेल्वे थांबताच कार्यकर्ते इतर प्रवाशांनी पडलेल्या वृद्धाला रेल्वेत टाकले आणि त्याला ढकलणाऱ्या आरोपीला पकडून औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर आणले. रेल्वे पोलिस निरीक्षक अरविंद शर्मा, उपनिरीक्षक आनंद बनसोडे संतोषकुमार सोमाणी यांनी वृद्धाला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. धावत्या रेल्वेतून पडल्याने वृद्धाचे पाय आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून आरोपीला ताब्यात घेतल्याचे बनसोडे यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...