आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिडक्यात नामफलकाची विटंबना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव - तालुक्यात संवेदनशील असलेल्या तिडका येथील बौद्ध वस्तीमधील "जगाला बुद्ध हवा युद्ध नको' या नामफलकाची सोमवारी (१३ जुलै) मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने विटंबना केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस येताच संतापलेल्या समाजबांधवांनी नामफलकाजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
संतापलेल्या बांधवांसह महिलांनीही सोयगाव-चाळीसगाव रस्त्यावर सकाळी ६ वाजेपासून ठिय्या मांडत रास्ता रोको केला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच समाजबांधवांनी तत्काळ नामफलक असलेल्या चौकात धाव घेतली. प्रशसानाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर ठिय्या मांडत रस्ता रोको आंदोलन केले. हे आंदोलन दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू असल्याने या महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेची माहिती तहसीलदार नरसिंग सोनवणे, चुन्नीलाल कोकणी, व्ही.टी. जाधव, सतीश माने, सुजित बढे, खोपडे, शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.