आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘घृष्णेश्वरास’ तगडा पोलिस बंदोबस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेरुळ - श्रावणातील पहिल्या सोमवारनिमित्त (दि. 12) वेरूळ येथील बारावे ज्योर्तीलिंग घृष्णेश्वर मंदिरात लाखो भाविक हजेरी लावणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

श्रावणातील पहिला सोमवार असल्याने या ठिकाणी मोठय़ा संख्येने भाविक येतात. त्यादृष्टीने मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खुलताबाद पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या उपस्थितीत मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आला आहे.

बंदोबस्तात 12 सहायक व पोलिस उपनिरीक्षक, 100 पोलिस शिपाई, 50 पुरुष होमगार्ड, 10 महिला होमगार्ड कर्मचार्‍यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.

सोबत बॉम्ब शोधक पथक, दंगा नियंत्रण पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे दहा कर्मचारी मदतीला देण्यात आले आहेत. सोळा सिसीटीव्ही परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहेत. वेरूळ मार्गावरील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत. मंदिरामध्ये दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.