Home »Maharashtra »North Maharashtra »Nashik» Time Bond Inquiry In Brain Dead Case

‘ब्रेनडेड’ प्रकरणी कालबध्द चौकशीचे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांचे आदेश

प्रतिनिधी | Oct 09, 2017, 08:37 AM IST

  • ‘ब्रेनडेड’ प्रकरणी कालबध्द चौकशीचे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांचे आदेश
नाशिक, मालेगाव-नाशिक येथील जया मगर- जामदार या अपघातग्रस्त महिलेला ब्रेनडेड घाेषित केल्याप्रकरणाची अाराेग्य विभागाने गंभीर दखल घेतली अाहे. याबाबत तीन महिन्यांत कालबध्द चौकशी करण्याचे आदेश मानवी प्रत्यारोपण विभागाला देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. तसेच या प्रकरणी दोषी आढळल्यास संबंधित डॉक्टर तसेच रुग्णालयांचे परवाने रद्द केले जातील असेही डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

विशेष मिशन इंद्रधनुष्य माेहिमेच्या शुभारंभी मालेगाव दौऱ्यावर आले असता डाॅ. सावंत यांनी या प्रकरणी कारवाईचे संकेत दिले. डाॅ. सावंत म्हणाले, घटनेचा संपूर्ण अहवाल मागविण्यात अाला अाहे. संबंंधित महिलेला घाईने ब्रेनडेड घाेषित करण्याचा प्रकार अत्यंत गंभीर अाहे. यात चूक कुणाची याचा उलगडा चाैकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच हाेईल. जे काेणी दाेषी असतील त्यांच्यावर कठाेर कारवाई निश्चितच हाेईल. ज्या रुग्णालयांवर अाराेप ठेवण्यात अाले अाहे. त्यांना नाेटिस बजावण्यात अाल्या अाहेत. यात जर रुग्णालयांची चूक असेल तर रुग्णालयांचे परवाने रद्द करून संबंधित डाॅक्टरांविराेधात पुढील कारवाई निश्चित केली जाणार असल्याचे डाॅ. सावंत यांनी स्पष्ट केले. नाशिक सामान्य रुग्णालयातील बालमृत्यू प्रकरणाचीही चाैकशी सुरू अाहे. बालमृत्यूच्या पार्श्वभूमीवर डाॅ. सावंत यांनी मालेगावच्या सामान्य रुग्णालयास भेट देऊन प्रसूतीकक्षाची पाहणी केली. प्रसूत माता लहान बालकांवर सुरू असलेल्या उपचारांचा अाढावा घेतला. उपचारात कुठल्याही प्रकाराची दिरंगाई किंवा कुचराई सहन केली जाणार नाही, असा इशारा देत प्रसुतीसाठी येणाऱ्या रुग्णांना तातडीची सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही अाराेग्यमंत्री डाॅ. सावंत यांनी केल्या.

प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न
मालेगावशहरातील बालमृत्यू विषयाकडे काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अाराेग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. यावर डाॅ. सावंत यांनी पुरेशा उपाययाेजना सुरू असल्याचे सांगितले. मात्र, राज्यमंत्री भुसे यांनी रुग्णालयांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण नगण्य असल्याचे स्पष्ट केले. तरीही बालमृत्यू राेखण्यासाठी एक चळवळ उभी करू, असे उत्तर देत या गंभीर प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला

Next Article

Recommended