आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिप्परची स्कूटीला धडक; पोदार इंटरनॅशनलची कर्मचारी तरुणी जखमी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पोदार इंटरनॅशनल शाळेतील कर्मचारी दीपिका नारायण व्यास (22, रा. एन-4) यांच्या स्कूटीला वाळूच्या भरधाव टिप्परने पाठीमागून धडक दिल्याने त्या जखमी झाल्या. दीपिका सकाळी आठ वाजता शाळेत जात असताना सूतगिरणी चौकात हा अपघात झाला. टिप्परने तरुणीला जवळपास 30 फुटांपर्यंत फरपटत नेले. अपघातानंतर जवाहरनगर आणि मुकुंदवाडी पोलिसांत हद्दीवरून वाद झाला.

वाळूचे भरधाव टिप्पर (एमएच 20 डब्ल्यू 1112) देवळाईकडे जात होते. त्याच वेळी शाळेत स्कूटीवर (एमएच 20 बीएफ 2494) जाताना दीपिकाला या टिप्परने उडवले. यात दीपिका यांच्या डोक्याला, डाव्या हाताला आणि उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच स्कूटी चक्काचूर झाली. अपघात घडताच एका महिलेने दीपिकाला तत्काळ हेडगेवार रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.