आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरुपती देवस्थानाला 1972 मध्येच ग्लोबल लूक मिळाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जगातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून परिचित असलेल्या तिरुपती तिरुमला देवस्थानाला ग्लोबल लूक देण्याची सुरुवात १९७२ मध्येच करण्यात आली. आंध्र प्रदेशचे तत्कालीन सचिव पीव्हीआरके प्रसाद यांनी या देवस्थानाचा आराखडा तयार करून राबवल्याने आज या देवस्थानाचा परिसर डोळे दिपवणारा ठरला.
हे गुपित खुद्द प्रसाद यांनीच "दिव्य मराठी'शी गप्पा मारताना उलगडले. खासगी कार्यक्रमानिमित्त ते शहरात आले होते. शिर्डीला दर्शनाला जाण्यापूर्वी त्यांनी "दिव्य मराठी'शी गप्पा मारल्या. गप्पांच्या ओघात त्यांनी ४० वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेतील काही अनुभवही सांगितले, ते त्यांच्याच शब्दांत..

१९७२ मध्ये आंध्र प्रदेशचा सचिव असताना काही कामानिमित्त ते तिरुपती येथे गेले होते. मंदिराभोवती असलेली वस्ती आणि दुर्दशा पाहून मन विषण्ण झाले. राज्याचा सचिव असल्याने काही तरी केल्यास या देवस्थानाचे नाव जगभरात जाऊ शकते, असे वाटले. सचिवालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्याच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले. आराखडा तयार झाल्यावर मंदिर परिसरातील गावकऱ्यांचे पुनर्वसन करून परिसर रिकामा करून घेतला. जागतिक दर्जाचा विकास आराखडा तयार करण्यात आला. कामाची ही चुणूक पाहून १९७८ ते १९८२ या काळात तिरुपती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. पर्यटक अन् भाविकांचा विचार करून डोंगर खोदून रस्ते तयार केले. गाडी थेट मंदिराच्या आवारापर्यंत जाऊ लागली.

नरसिंह रावांचे माहिती सल्लागार..
माजी पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव यांनी तिरुपती संस्थानातील कामाची चुणूक पाहून पंतप्रधान कार्यालयाचे माहिती सल्लागार म्हणूनही माझी नेमणूक केली. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सहवासात दहा वर्षे घालवली. या अनुभवांचाच लेखसंग्रह मी पुस्तकरूपात प्रकाशित केला. तो अनेक भाषांत उपलब्ध असून लवकरच त्याची मराठी भाषेतील आवृत्ती प्रसिद्ध होणार आहे. याचे भाषांतर प्रा. दिनकर बोरीकर हे करत आहेत.