आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tirupati Railway Not Come, 380 Passenger Face Problems

तिरुपती रेल्वे आलीच नाही, ३८० प्रवाशांचे हाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तिरुपतीसाठी नव्याने सुरू झालेली एक्स्प्रेस शुक्रवारी दुपारी चार वाजता नियोजित
वेळेवर औरंगाबादला आलीच नसल्यामुळे प्रवाशांचा चांगलाच हिरमोड झाला. १९ तास
उशिराने धावणारी हे रेल्वे आता शनिवारी सकाळी ११ वाजता औरंगाबाद स्टेशनवरून
निघणार आहे.

तिरुपतीसाठी दर शुक्रवारी दुपारी चार वाजता औरंगाबाद- तिरुपती रेल्वेगाडी सुरू झाली. २३ जानेवारीला जाणा-या गाडीसाठी ३८० प्रवाशांनी डिसेंबरमध्येच आरक्षण केले होते; परंतु ही गाडी १९ तास उशिराने धावत आहे. शंभरवर प्रवाशांनी आरक्षण रद्द केले तर उर्वरित प्रवासी शनिवारी सकाळी या गाडीने निघतील.
सुरेश प्रभूंना फोन करा : देशातील ९० टक्के रेल्वेचे टायमिंग कोलमडले आहे. नवीन सरकार आल्याने काही तरी सुधारणा होतील, अशी अपेक्षा होती; पण ती फोल ठरत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंचे लक्ष कुठे आहे? अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.
आनंदावर विरजण
मुलगा, मुलगी बाहेर शिकायला आहेत. वेळेवर स्टेशनवर पोहोचले; पण रेल्वे उशिरा
धावत असल्याचे कळले. त्यामुळे आनंदावर विरजण पडले. पुढील नियोजन कोलमडले
आहे.
हेमंत दिनकर, प्रवासी

कारण माहिती नाही
तिरुपतीला जाणारी रेल्वे १९ तास उशिरा धावत आहे. त्याला आम्ही काहीच करू शकत
नाही. तिरुपतीहून सुटलेली गाडीच उशिरा येत आहे. या उशिराची कारणे मला माहिती
नाहीत. ए. सी. निकम, स्टेशन प्रबंधक, औरंगाबाद