आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद बलात्कारप्रकरातील आरोपींना अटक, न्‍यायालयीन कोठडीत रवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद; तिसगावशिवारात सोमवारी रात्री १७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी मंगळवारी रात्री ११ वाजता साजापूर परिसरातून अटक केली. दरम्‍यान,फरार असलेला बबन सोनोने या चौथ्‍या आरोपीलाही पोलिसांनी आज (बुधवार) अटक केली आहे. रात्री अटक केलेल्‍यामध्‍ये रूपचंद तिर्थे, शेख सत्तार, मच्छिंद्र गायकवाड यांचा समावेश आहे. या चौघांनाही न्‍यायालयीन कोठडी सुनावण्‍यात आली आहे.
आरोपींना शोधण्यासाठी शहर पोलिसांची दहा पथके तैनात करण्यात आली होती. या पथकात शहरातील १५ पोलिस ठाण्यांतील १५० पेक्षा अधिक पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. मंगळवारी पहाटेच चार्ली, स्ट्रायकिंग फोर्स शीघ्र कृती दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. साजापूर, तिसगाव आजूबाजूच्या परिसरात या जवानांनी कोंम्बिग ऑपरेशन केले. दरम्यान, या भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगार, अॅपेरिक्षाचालक यांचीही पोलिसांनी चौकशी केली. अत्याचार करणाऱ्या चार जणांपैकी एकाने खाकी शर्ट घातला होता. मुलीने त्याच्या बोटाचा कडकडीत चावा घेतला. वाळूज - बाबा पेट्रोल पंप मार्गावर अॅपेरिक्षा चालकांची चौकशी करण्यात आली. नराधमाने तिच्याकडून मोबाइल हिसकावून घेतला होता. या मोबाइलचे लोकेशन कांचनवाडी परिसरात होते. ही कारवाई एमआयडीसी वाळूज, छावणी, गुन्हे शाखा पोलिसांनी केली. तिसगाव शिवारात पोलिसांनी कोंम्बिग ऑपरेशन केले.

ती मुलगी अशिक्षित
पीडित मुलगी ही अत्यंत सामान्य कुटुंबातील आहे. तिचे शिक्षणही झाले नसून स्वत:चे वय देखील सांगता येत नाही. मुलीचे वडील मिस्त्री काम करतात, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.